हिंगोली : मागील आठवडाभरापासून अवकाळी संकट जिल्हावासीयांची पाठ सोडत नसल्याचे चित्र आहे. १७ मे रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास अर्धा ते पाऊण तास जिल्ह्यातील बहुतांश भागात वादळी वारा, मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा मारा झाला. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतात वाळवणीसाठी
जिल्ह्यात ११ व १२ मे रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला होता. त्यानंतर चार दिवस ढगाळ वातावरण कायम राहिले. परंतु, अवकाळी पावसाने हजेरी लावली नव्हती. १७ मे रोजी मात्र हिंगोली शहर व परिसर वगळता जिल्ह्यातील बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
वसमत तालुक्यातील कुरूंदा, महंमदपूरवाडी, पिंपराळा, आंबा चौंडी, वर्ताळा, कुरूंदवाडी, कौठा, बोराळा, खुदनापूर, आडगाव (रंजे.), हट्टा परिसरात २:३० वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.याशिवाय हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव, सवड, घोटा, केसापूर, देऊळगाव (रामा), डिग्रस कऱ्हाळे, संतुक पिंपरी, लिंबाळा (मक्ता) भागात सुमारे अर्धातास पाऊस झाला. या पावसादरम्यान वादळी वाऱ्याचा वेग मोठा असल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती. तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार, नागेशवाडी, शिरडशहापूर परिसर, कळमनुरी शहरासह तालुक्यात पावसाने हजेरी लावली.
नर्सीजवळील लेंडी ओढ्याला वाहिले पाणी...हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव परिसरात शनिवारी दुपारी सुमारे अर्धातास जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतात पाणीच पाणी झाले होते. तर नर्सी परिसरातून वाहणाऱ्या लेंडी ओढ्याला सुमारे गुडघाभर पाणी आले होते. या पावसामुळे शेतीकामे थांबली असून, आणखी दोन ते तीन दिवस मशागतीची कामे करता येणार नाहीत.