हिंगोली जिल्ह्यात बोंडअळीने कपाशीचे उत्पन्न घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 00:10 IST2017-12-14T00:07:22+5:302017-12-14T00:10:00+5:30
यावर्षी बोंडआळीने शेतक-यांना हैराण करुन सोडले असून, कापसाच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. मात्र कपाशीला ४ हजार ७०० रुपयाचा भाव मिळाल्याने शेतकरी काही प्रमाणात समाधानी आहेत.

हिंगोली जिल्ह्यात बोंडअळीने कपाशीचे उत्पन्न घटले
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : यावर्षी बोंडआळीने शेतक-यांना हैराण करुन सोडले असून, कापसाच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. मात्र कपाशीला ४ हजार ७०० रुपयाचा भाव मिळाल्याने शेतकरी काही प्रमाणात समाधानी आहेत.
मागील तीन ते चार वर्षांपासून शेतकºयांवर निसर्ग कोपल्याने शेतकरी कर्जबाजारी होत चालले आहेत. यंदाही निसर्गाने तर सोडलेच नाही त्यात भर म्हणून बोंड आळीने शेतकºयांच्या नाकीनऊ आणून सोडले आहेत. ज्या शेतीमध्ये क्विंटलाने होणारे कपाशीचे उत्पन्न झाले. ते आता किलोने मोजण्याची वेळ शेतकºयांवर येऊन ठेपली आहे. एकेकाळी शेतातून कापूस आणताना गाडीबैलांच्या दोन फेºया केल्या जात होत्या. आता मात्र कापूस डोक्यावर आणला जात आहे. मागील वर्षी तरी बºयापैकी उत्पन्न झाले होते. यंदा परिस्थिती फारच गंभीर असल्याचे शेतकºयांतून बोलल्या जात आहे. ४ हजार ३२० रुपये शासकीय भाव असून खाजगी बाजारात ४ हजार ७०० रुपये भाव मिळत असल्याने खरेदी केंद्रावर कापूस विक्री करण्यासाठी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे शासकीय केंद्रावर कापसाची खरेदी केल्यानंतर पैशाची प्रतीक्षा करण्याचे टाळण्यासाठी खाजगी खरेदी केंद्रावर कापासाची शेतकरी विक्री करीत आहेत. एकट्या हिंगोली शहरात एकूण ६ खाजगी खरेदी केंद्र सुरु असून त्यापैकी एक बंद पडले आहे. फक्त ५ खरेदी केंद्रावर खरेदी सुरु आहे. तेथे रात्रीपासून वाहनांच्या लांबलचक रांगा लागत असल्याचे पहावयास मिळत आहे.