शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

हिंगोली जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत बेवडे जास्तच झिंगाट... !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 1:14 AM

गतवर्षी नोटाबंदी, दुष्काळी परिस्थिती, दारू व बारवर आलेले न्यायालय निर्णयाचे गंडांतर यामुळे मद्यविक्री घटली होती. मात्र या सर्वच परिस्थितीत सुधारणा झाली म्हणून की काय यंदा विदेशी दारू व बीअर विक्रीत तब्बल ७५ टक्क्यांची झिंगाट वाढ झाल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देतीन महिन्यांतच २.७३ लाख लिटरची विक्रीवाढ

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : गतवर्षी नोटाबंदी, दुष्काळी परिस्थिती, दारू व बारवर आलेले न्यायालय निर्णयाचे गंडांतर यामुळे मद्यविक्री घटली होती. मात्र या सर्वच परिस्थितीत सुधारणा झाली म्हणून की काय यंदा विदेशी दारू व बीअर विक्रीत तब्बल ७५ टक्क्यांची झिंगाट वाढ झाल्याचे चित्र आहे.हिंगोली जिल्ह्यात २0१७-१८ या आर्थिक वर्षातील एप्रिल, मे व जून महिन्यातील मद्यविक्रीची तुलना यंदाच्या वर्षातील या महिन्याशी केल्यास हा फरक स्पष्टपणे जाणवतो. गतवर्षी एप्रिलमध्ये देशी दारूची विक्री २.७८ लाख तर यंदा ३.४६ लाख बल्क लिटर विक्री झाली. मेमध्ये ३.३३ हून ३.३९ लाख तर जूनमध्ये ३.२२ लाखहून ३.३१ लाख लिटरवर गेल्याचे चित्र आहे. या तीन महिन्यांत ८४ हजार ११४ बल्कलिटर जास्त दारू विकली गेली. विदेशी दारू गतवर्षी एप्रिलला २७ हजार तर यंदा ५८ हजार मेमध्ये गतवर्षी ३६८९५ तर यंदा ५८५८८, जूनमध्ये गतवर्षी ३४२३५ तर यंदा ५५७0६ बल्कलिटर दारूची विक्री झाली आहे. विदेशी दारूच्या विक्रीत तुलनेने तब्बल ७५.४९ टक्क्यांनी वाढ झाली. ७४२३८ लिटर दारूची जास्त मागणी झाली आहे.बीअरच्या बाबतीतही असेच चित्र आहे. गतवर्षी एप्रिलमध्ये ४८0२६ तर यंदा ९६८७१, मेमध्ये गतवर्षी ६४१८८ तर यंदा १ लाख ७ हजार २९७, जूनमध्ये गतवर्षी ४११८६ तर यंदा ६३१९0 बल्क लिटरची विक्री झाली आहे. बीअरची विक्री तर तब्बल १ लाख १३ हजार ९५८ लिटरने वाढली असून प्रमाण ७४.२९ टक्के आहे.वाईनलाही मागणीएकीकडे विदेशी व बीअर ढोसणाऱ्यांचे प्रमाण वाढत असताना वाईन पिणारेही वाढल्याचे दिसत आहे. गतवर्षी तीन महिन्यांत १५0 तर यंदा ९१४ बल्कलिटर वाईन विकली गेली. विक्री वाढीचे हे प्रमाण तब्बल ५0९ टक्के आहे. कमी खर्चिक प्रकाराकडेही काही वळल्याचे दिसते.२.७३ लाख लिटरने विक्री वाढलीया सर्व प्रकारात २.७३ लाख बल्क लिटरने मद्यविक्री वाढली आहे. देशीची एकूण विक्री १0.१८ लाख, विदेशीची १.७२ लाख, बीअरची १.१३ लाख तर वाईनची ९१४ बल्क लिटर एवढी विक्री झाली.---२९ ठिकाणी छापेहिंगोली जिल्ह्यात अवैध दारूविक्री विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने २९ ठिकाणी छापे टाकले. यामध्ये १५ ठिकाणी आरोपींसह मुद्देमाल मिळाला. मात्र १४ प्रकरणांत बेवारस मुद्देमाल म्हणून कारवाई झाली. यामध्ये रसायन ३0 लिटर, देशी दारू १00.७ लिटर, विदेशी दारू १२.९८ लिटर तर बिअर २.२६ लिटर जप्त करण्यात आली. याची किंमत ३२ हजार ९८४ रुपये आहे. या कारवाईदरम्यान ६५ हजार रुपये किमतीची दोन वाहनेही उत्पादनच्या पथकाने जप्त केली आहेत.

टॅग्स :Hingoliहिंगोलीalcohol prohibition actदारुबंदी कायदाbusinessव्यवसाय