शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

हिंगोली जिल्ह्यात वर्षभरात ९९३ क्षयरूग्णांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 11:38 PM

क्षयरोग समूळ उच्चाटनासाठी आरोग्य यंत्रणेकडून क्षयरोग नियंत्रण मोहीम राबवून जनजागृती केली जात आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१७ या वर्षात आरोग्य विभागाने मोहीम राबवून ९९३ क्षयरूगणांचा शोध घेतला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : क्षयरोग समूळ उच्चाटनासाठी आरोग्य यंत्रणेकडून क्षयरोग नियंत्रण मोहीम राबवून जनजागृती केली जात आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१७ या वर्षात आरोग्य विभागाने मोहीम राबवून ९९३ क्षयरूगणांचा शोध घेतला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.भारतात दिवसेंदिवस क्षयरोग रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे देशातून टीबी हद्दपार करण्यासाठी २०२५ हे टार्गेट ठेवले आहे. परंतु खासगी रुग्णालयात टीबीवर उपचार घेणाऱ्या रुग्णांबाबत सरकारकडे माहिती नाही. त्यामुळे सरकारने टीबी रुग्णांची माहिती देणाºया खासगी डॉक्टरांना ५०० रूपये तर फार्मासिस्टना १००० रुपय मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. क्षयरोगबाधित रुग्ण पूर्णपणे उपचार घेत नाहीत, त्यामुळे क्षयरोग बरा होत नाही. जे की, रूग्णांना डॉक्टरांनी दिलेला संपूर्ण डोस वेळेत व नियमित घेणे आवश्यक आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.राहूल गिते, प्रशांत तुपकरी यांनी केले आहे.जिल्ह्यात क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत ५ टिबी युनिट कार्यरत असून २९ आरोग्य संस्थेमार्फत कार्यक्रम राबविला जात आहे. क्षयरोग निदानासाठी १५ थुंकी तपासणी केंद्र कार्यरत आहेत. शासकीय आरोग्य संस्था, खासगी-व्यावसायीक, आशा, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत रूग्णांना औषधोपचार दिला जात आहे. क्षयरोगाच्या अचूक व त्वरित निदानासाठी जिल्हा क्षयरोग्य केंद्र येथे जिन एक्सपर्ट सुविधेद्वारे १००३ चाचण्या केल्या. त्यापैकी २०३ रूग्ण शोधले असून १८ एमडीआर रूग्णांचा यात समावेश आहे. वर्षभरात ९९३ रूग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ताप, भूक मंदावणे, छातीत दुखणे असे लक्षणे दिसल्यास क्षयरोगाची चाचणी करून घ्यावी.क्षयरोगाचे जंतू मुख्यत: हवेतून पसरतात. फुुफुसाचा क्षयरोग झालेली रूग्ण ज्यावेळी खोकतो किंवा शिंकतो तेव्हा ते जंतू शरीरात प्रवेश करतात. जंतू सूक्ष्म थेंबाद्वारे हवेत पसरतात. निरोगी व्यक्ती जेव्हा श्वास घेतो, तेव्हा जंतू शरीरात प्रवेश करतात व क्षयरोग होऊन जंतूसंसर्ग होतो. मात्र संसर्ग झालेल्या सर्वच व्यक्तींना क्षयरोग होत नाही. त्या व्यक्तीच्या शरीरात हे जंतू वर्षानुवर्ष सुप्त अवस्थेत असतात. अशा संसर्गित व्यक्तीला बाधा होण्याची आयुष्यात १० टक्के शक्यता असते.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरHealthआरोग्यHingoliहिंगोली