शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्ह्यात १७१ पाणी नमुने आढळले दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 16:42 IST

आता टंचाईचा काळ सुरू झाल्याने मिळेल ते पाणी वापरण्याची वेळ ग्रामस्थांवर येत आहे

हिंगोली : आता टंचाईचा काळ सुरू झाल्याने मिळेल ते पाणी वापरण्याची वेळ ग्रामस्थांवर येत आहे. त्यातच दूषित पाणीनमुन्यांचे प्रमाणही वाढत चालले असून विशेषत: कळमनुरी तालुक्यात सर्वाधिक पाणीनमुने दूषित आढळून येत आहेत. यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे.

यंदा अल्पपर्जन्यामुळे जिल्ह्याच्या काही भागात टंचाईच्या तीव्र झळा जाणवत असतानाही प्रशासनाची दिरंगाई टंचाईत उपाययोजना न होण्यास कारणीभूत ठरत आहे. तर दुसरीकडे मागील काही दिवसांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे गारपीट, पावसासह ढगाळ वातावरणाचा सामना करावा लागला. यामुळे चार दिवसांपूर्वीच आटणारे स्त्रोत कसेतरी चार दिवस लांबले. मात्र आता टंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. तर अनेक ठिकाणी पाणीस्त्रोतही दूषित असल्याचे आढळून येत आहे. यातील काही तर टंचाईत बंदही झाले आहेत. अनेक ठिकाणी टीसीएल पावडरचा वापर अजूनही होत नसून यंदाच्या वातावरण बदलामुळे तर शुद्ध पाणीपुरवठा आवश्यक आहे. मात्र तसे होत नसल्याने रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. 

प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय चित्रहिंगोली तालुक्यात नर्सी नामदेव केंद्रात २७ पैकी ६, भांडेगावात ३२ पैकी २, सिरसम २० पैकी ०, फाळेगावात १९ पैकी ११, वसमत तालुक्यात हट्टा १९ पैकी ११, कुरूंद्यात २३ पैकी १, हयातनगरात ३५ पैकी ११, गिरगावला २० पैकी ३, टेंभुर्णीत २२ पैकी ६, पांगरा २० पैकी ०, सेनगाव तालुक्यात गोरेगाव २० पैकी ५, कवठा १९ पैकी १२, साखरा २९ पैकी ३, कापडसिंगी २० पैकी ७, जवळाबाजारमध्ये २४ पैकी ३, शिरडशहापूर १९ पैकी ०, पिंपळदरीत १० पैकी १, लोहर्‍यात ३४ पैकी १३ पाणी नमुने दूषित आढळले आहेत. तर कळमनुरी तालुक्यात आखाडा बाळापूरात १७ पैकी ८, डोंगरकड्यात ३६ पैकी १३, रामेश्वर तांड्यात ४१ पैकी १२, पोत्र्यात ४२ पैकी १८, मसोडला ४२ पैकी २१ तर वाकोडीत ६४ पैकी ४ पाणी नमुने दूषित आढळले.

टॅग्स :WaterपाणीHingoliहिंगोलीDamधरण