हिंगोलीत नगरसेवकावर हल्ला; दोघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:46 IST2018-03-04T00:46:13+5:302018-03-04T00:46:17+5:30

येथील नगरपालिकेतील नगरसेवक नरसिंग उर्फ नाना विश्वासराव नायक यांना दोघांनी जबर मारहाण करून चाकूहल्ला केला. तसेच गळ्यातील ७ तोळे सोन्याची चैन आरोपींनी लांबविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

 Hingoli city corporator attacked; Crime on both sides | हिंगोलीत नगरसेवकावर हल्ला; दोघांवर गुन्हा

हिंगोलीत नगरसेवकावर हल्ला; दोघांवर गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील नगरपालिकेतील नगरसेवक नरसिंग उर्फ नाना विश्वासराव नायक यांना दोघांनी जबर मारहाण करून चाकूहल्ला केला. तसेच गळ्यातील ७ तोळे सोन्याची चैन आरोपींनी लांबविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सदर घटना २ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घडली.
याप्रकरणी नगरसेवक नरसिंग नायक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सुमित मुदिराज, राजू राकेवार, या दोघांविरूद्ध हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायक यांना रंग लावण्यासाठी म्हणून संबंधितांनी आडविल्यानंतर हा प्रकार घडल्याचे सांगितले. तसेच आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांना देण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, शेख शकील, सुभाष बांगर, गणेश बांगर, राम कदम, आरेफ लाला, उमेश गुठ्ठे आदी उपस्थित होते.

Web Title:  Hingoli city corporator attacked; Crime on both sides