डोंगरकडा फाटा - जवळा पांचाळ रस्ता दुरुस्तीला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:24 IST2021-01-15T04:24:48+5:302021-01-15T04:24:48+5:30

जवळा पांचाळ : कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा फाटा ते जवळा पांचाळ दरम्यानच्या ७ किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या ...

Hill breaks - breaks near Panchal road repairs | डोंगरकडा फाटा - जवळा पांचाळ रस्ता दुरुस्तीला ‘ब्रेक’

डोंगरकडा फाटा - जवळा पांचाळ रस्ता दुरुस्तीला ‘ब्रेक’

जवळा पांचाळ : कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा फाटा ते जवळा पांचाळ दरम्यानच्या ७ किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले असून, रस्त्याच्या एका बाजूने थातूरमातूर पद्धतीने काम करून दुसऱ्या बाजूचे काम तसेच ठेवल्याने या दुरूस्तीच्या कामाला ‘ब्रेक’ लागला आहे.

डोंगरकडा फाटा ते जवळा पांचाळ दरम्यानचा रस्ता खराब झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले. यानंतर रस्त्याच्या दुरुस्ती कामाला सुरुवात झाली. परंतु, ही दुरुस्ती नावालाच करण्यात येत असल्याची चर्चा वाहनचालकांतून होत आहे. एका बाजूने थातूरमातूर दुरूस्ती करत एक बाजू तशीच ठेवण्यात आली असल्याने ये-जा करणाऱ्यांची मात्र गैरसाेय हाेत आहे. या रस्त्याचे उर्वरित काम पूर्ण करण्याची मागणी परिसरातील नागरिकांतून हाेत आहे.

फाेटाे नं. ०८

Web Title: Hill breaks - breaks near Panchal road repairs