गंभीर रुग्णांना नेण्यासाठी जिल्ह्यात ‘आरोग्य’च्या भंगार रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:29 AM2021-03-05T04:29:41+5:302021-03-05T04:29:41+5:30

जिल्ह्यात २५ प्राथमिक आरोग्य केंद्रे सद्यस्थितीत कार्यरत आहेत. सर्वच ठिकाणी रुग्णवाहिका कार्यरत आहेत. या रुग्णवाहिका १५ ते २० वर्षांपूर्वी ...

‘Health’ scrap ambulances in the district to transport critically ill patients | गंभीर रुग्णांना नेण्यासाठी जिल्ह्यात ‘आरोग्य’च्या भंगार रुग्णवाहिका

गंभीर रुग्णांना नेण्यासाठी जिल्ह्यात ‘आरोग्य’च्या भंगार रुग्णवाहिका

Next

जिल्ह्यात २५ प्राथमिक आरोग्य केंद्रे सद्यस्थितीत कार्यरत आहेत. सर्वच ठिकाणी रुग्णवाहिका कार्यरत आहेत. या रुग्णवाहिका १५ ते २० वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या अहेत. त्यामुळे या सर्वच रुग्णवाहिकांची अवस्था वाईट झालेली आहे. बऱ्याच वेळा या रुग्णवाहिका रस्त्यातच बंद पडतात. त्यामुळे गंभीर रुग्णांना जिल्हा रुग्णालयात नेण्यास उशिर होतो. कित्येक वेळा अनेक समस्यांना सामोरे जावेही लागत आहे. जिल्हा रुग्णालयात ८ रुग्णवाहिका असून ५ रुग्णवाहिका या भंगार अवस्थेत आहेत. यामध्ये काही २००५ च्या आहेत तर काही २०१३ मध्ये खरेदी केलेल्या आहेत.

जिल्हा सामान्य रुग्णालयात एप्रिलपासून आजपर्यंत १७०६ रुग्ण रेफर करण्यात आलेले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात रोज १० ते १५ रुग्ण रोज येत असतात. गंभीर रुग्णांची रेफर संख्या लक्षात घेता नवीन रुग्णवाहिका जिल्हा सामान्य रुग्णालयात घेणे आता गरजेचे झाले आहे.

प्रतिक्रिया/ बॉक्स

२७ व्हॅनला मिळाली मंजुरी

जिल्ह्यात २५ प्राथमिक आरोग्य केंद्रे सद्यस्थितीत कार्यरत आहेत. आजमितीस ही सर्वच वाहने जुनी झाली आहेत. जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील प्राथमिक विभागातील रुग्णवाहिका या जुन्या झाल्याने नवीन २७ रुग्णवाहिकेसाठी पाठपुरावा करून २७ रुग्णवाहिका मंजूर करुन घेतल्या आहेत. अजून तरी त्या आरोग्य विभागाला मिळालेल्या नाहीत.

-डाॅ. शिवाजी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, हिंगोली

जिल्हा रुग्णालयाला रोज किती रेफर ?

जिल्ह्यातून सर्वच ठिकाणावरून जिल्हा रुग्णालयाला रोज १० ते १५ रुग्ण रेफर केले जातात. सद्यस्थितीत जिल्ह्यात २४ प्राथमिक आरोग्य केंद्र तर १३२ उपकेंद्रे आहेत. सर्वच ठिकाणावरुन जिल्ह्याच्या ठिकाणी रेफर केले जाते.

सर्वच ठिकाणी रुग्णवाहिका पण जुन्या

जिल्ह्यात २५ ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. परंतु, रुग्णवाहिका मात्र जुन्याच आहेत. त्यामुळे त्या कधी बंद पडतील, कधी चालू होतील, याचा काही नेम सांगता येत नाही. मंजूर रुग्णवाहिका केव्हा मिळतील, याकडे लक्ष लागले आहे.

रुग्णवाहिकेचा विमा काढलेला नाही

जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका आहेत. परंतु, गाड्या जुन्या झाल्याने त्यांचा विमा काढलेला नाही. नवीन मंजूर २७ रुग्णवाहिका आल्या की त्याचा विमा उतरविला जाणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

Web Title: ‘Health’ scrap ambulances in the district to transport critically ill patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.