जिल्ह्यातील २ लाख ३६ हजार कुटुंबांची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:20 IST2021-06-20T04:20:58+5:302021-06-20T04:20:58+5:30

आरोग्य विभागाच्या वतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी, मीच माझा रक्षक, कोविड महाराष्ट्र मुक्त मोहिमेंतर्गत आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली. ...

Health check up of 2 lakh 36 thousand families in the district | जिल्ह्यातील २ लाख ३६ हजार कुटुंबांची आरोग्य तपासणी

जिल्ह्यातील २ लाख ३६ हजार कुटुंबांची आरोग्य तपासणी

आरोग्य विभागाच्या वतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी, मीच माझा रक्षक, कोविड महाराष्ट्र मुक्त मोहिमेंतर्गत आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली. तसेच परिवर्तन एक्स्प्रेस द्वारे जनजागृती करण्यात आली. यासाठी ५९५ पथकांची स्थापना करण्यात आली होती. यात १ हजार ७८५ कर्मचारी, ३७ डाॅक्टर, २९ रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आतापर्यंत २ लाख ३६ हजार ७१६ कुटुंबांतील १२ लाख १७ हजार ४५८ सदस्यांची तपासणी करण्यात आली. यात ग्रामीण भागातील १ लाख ९३ हजार ७३७ तर शहरी भागातील ४२ हजार ९७९ कुटुंबांचा समावेश होता. यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना टी शर्ट, ॲप्रोन, टोपी, आदी प्रसिद्धी साहित्य देण्यात आले होते. सध्या लसीकरणाची जनजागृती गावोगावी करण्यात येत आहे. ३० वर्षांवरील नागरिकांनी जास्तीत जास्त लसीकरण करुन घ्यावे, यासह आरोग्यविषयक आवाहन करण्यात येत आहे. सध्या पारेषण काळ चालू झाला असून कीटकजन्य आजाराबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी, डेंग्यू , हिवताप अशा कीटकजन्य आजाराची साथरोग टाळण्यासाठी घराजवळील परिसर, साचलेल्या नाल्या वाहत्या कराव्यात, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा, असे आवाहनही कोरोना परिवर्तन एक्स्प्रेस द्वारे जनजागृती करण्यात येत आहे.

फोटो :

Web Title: Health check up of 2 lakh 36 thousand families in the district