नर्सी येथे मुख्याध्यापक, शिक्षकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:54 IST2021-02-05T07:54:57+5:302021-02-05T07:54:57+5:30
या कार्यक्रमास नर्सी केंद्रातील कन्या शाळा, हळदवाडी, वैजापूर अठरवाडी, जांभरून येथील मुख्याध्यापक व शिक्षकांनी ताळेबंदी काळात शिक्षण विभाग, ...

नर्सी येथे मुख्याध्यापक, शिक्षकांचा सत्कार
या कार्यक्रमास नर्सी केंद्रातील कन्या शाळा, हळदवाडी, वैजापूर अठरवाडी, जांभरून येथील मुख्याध्यापक व शिक्षकांनी ताळेबंदी काळात शिक्षण विभाग, जिल्हा परिषद हिंगोली यांच्या निर्देशानुसार शाळा बंद; पण शिक्षण सुरू, स्वच्छ शाळा सुंदर शाळा, चित्रकला स्पर्धा, गणित जिनिअस सामान्यज्ञान अशा विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट सहभाग घेतला. शासनाने निश्चित केलेल्या शैक्षणिक व शैक्षणिक कामात सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली. त्याबद्दल सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना कोराेना योद्धा म्हणून सन्मानित केले. या कार्यक्रमास केंद्रप्रमुख ज्योती देव, सुधाकर गावंडे, सुधाकर महाजन फाउंडेशनचे उपाध्यक्ष केजकर, अमोल क्षीरसागर, सुधाकर महाजन यांच्यासह अनेकांची उपस्थिती हाेती. तसेच मन फाउंडेशनचे कार्य व ताळेबंद काळात शिक्षकांनी केलेल्या कार्याचा मान्यवरांनी उल्लेख केला. याप्रसंगी शिक्षणाची स्थिती व उपाय या विषयावर मार्गदर्शन केले.
फाेटाे नं १८