कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने संपवलं आयुष्य

By Admin | Updated: March 3, 2017 15:47 IST2017-03-03T15:47:20+5:302017-03-03T15:47:20+5:30

कर्जबाजारीपणाला कंटाळून एका व्यक्तीने स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. हिंगोली तालुक्यातील ढोलउमरो परिसरात ही घटना आहे.

He wasted his life with depression | कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने संपवलं आयुष्य

कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने संपवलं आयुष्य

 ऑनलाइन लोकमत

हिंगोली, दि. 3 - कर्जबाजारीपणाला कंटाळून एका व्यक्तीने स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. हिंगोली तालुक्यातील ढोलउमरो परिसरात ही घटना आहे. भानुदास चौधरी(वय 45) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केली. 
शेळ्या चरण्यासाठी घेऊन गेलेल्या मेंढपाळाच्या निर्दशनास हा प्रकार आला. याची माहिती त्यांनी लगेचच मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना दिली. यावेळी घटनास्थळावर मृतदेहाजवळ विषाची बाटली आढळून आली.  मृत भानुदास चौधरी यांच्यावर खाजगी कंपनीचे 60 हजार  रुपयांचे कर्ज असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. शेती त्यांच्या नावे नसून भावाच्या नावावर आहे.  
दरम्यान, पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवला आहे. 
 

Web Title: He wasted his life with depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.