कुलूप तोडून भरदिवसा ६६ हजाराचा ऐवज पळविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:34 IST2021-09-12T04:34:07+5:302021-09-12T04:34:07+5:30
हिंगोली तालुक्यातील कलगाव येथील जाफर खां नशीब खां पठाण हे ११ सप्टेंबर रोजी घराला कुलूप कोंडा लावून बाहेर गेले ...

कुलूप तोडून भरदिवसा ६६ हजाराचा ऐवज पळविला
हिंगोली तालुक्यातील कलगाव येथील जाफर खां नशीब खां पठाण हे ११ सप्टेंबर रोजी घराला कुलूप कोंडा लावून बाहेर गेले होते. घरी कुणी नव्हते. ही संधी साधून चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोंडा व कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील सुटकेसमध्ये ठेवलेले नगदी १६ हजार ५०० रुपये व सोन्याचे ५० हजाराचे दागिने असा एकूण ६६ हजार ५०० रुपयाचा ऐवज लांबविला. जाफर खां नशीब खां पठाण हे घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मळघणे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी जाफर खां नशीब खां पठाण यांच्या फिर्यादीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोलीस हवालदार भडंगे करीत आहेत.