हळदवाडी, अंभेरी तलावाचे काम चार महिने बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST2021-07-07T04:37:01+5:302021-07-07T04:37:01+5:30
हिंगोली : जिल्ह्यात सुरू असलेल्या हळदवाडी व अंभेरी तलावाचे काम सध्या पावसाळा असल्यामुळे बंद ठेवण्यात आले आहे. पावसाळ्यानंतर या ...

हळदवाडी, अंभेरी तलावाचे काम चार महिने बंद
हिंगोली : जिल्ह्यात सुरू असलेल्या हळदवाडी व अंभेरी तलावाचे काम सध्या पावसाळा असल्यामुळे बंद ठेवण्यात आले आहे. पावसाळ्यानंतर या दोन्ही तलावांचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे उपकार्यकारी अभियंता बी. आर. पतंगे यांनी दिली.
गत एक ते दीड वर्षापासून जिल्ह्यातील हळदवाडी व अंभेरी लघु तलावांचे काम सुरू आहे. सद्यस्थितीत भिंती उभारण्याचे काम वेगाने सुरू केले आहे. हळदवाडी लघु तलाव पूर्ण झाल्यास या तलावाचा लाभ नर्सी, हळदवाडी, वैजापूर या तीन गावांना होणार आहे. तर अंभेरी लघु तलाव पूर्ण झाला तर या तलावातील पाण्याचा लाभ अंभेरी, पाटन, खानापूर या तीन गावांना होणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना विविध पिके घेता येणार आहेत.
बाराही महिने शेतकऱ्यांना पाणी...
हळदवाडी लघु तलावाची पाणी साठवण क्षमता २.२७ दलघमी राहणार असून अंभेरी लघु तलावाची पाणी साठवण क्षमता ही १.७७ दलघमी राहणार आहे. त्यामुळे या दोन्ही तलावांचा ६ गावांना लाभ होणार आहे. बाराही महिने या तलावात पाणी राहणार असून शेतकऱ्यांना विविध पिके घेण्यासाठी लाभ होणार आहे.