हिंगोलीत पावणे तीन लाखांचा गुटखा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:19 IST2021-07-24T04:19:03+5:302021-07-24T04:19:03+5:30

हिंगोली तालुक्यातील हिंगोली ते वाशीम मार्गाने एका पिकअप वाहनातून गुटखा नेला जात असल्याची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. ...

Gutkha worth Rs 3 lakh was seized in Hingoli | हिंगोलीत पावणे तीन लाखांचा गुटखा पकडला

हिंगोलीत पावणे तीन लाखांचा गुटखा पकडला

हिंगोली तालुक्यातील हिंगोली ते वाशीम मार्गाने एका पिकअप वाहनातून गुटखा नेला जात असल्याची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सपोनि काचमांडे, आशिष उंबरकर, रवी हारकळ, गजानन पोकळे यांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी अशोका धाब्याजवळ एका विनाक्रमांकाच्या पिकअप वाहनाला थांबविले. यात पाहणी केली असता गुटखा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी पिकअप वाहन ताब्यात घेऊन हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात लावले. यात पाहणी केली असता विविध कंपनीचा २ लाख ७० हजार ५६० रूपयांचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी गुटखा व ३ लाख २० हजार रूपये किमतीचे वाहन असा एकूण ५ लाख ९० हजार ५६० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोह. आशिष उंबरकर यांच्या फिर्यादीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात असराजी उर्फ पप्पू चव्हाण, विजय उर्फ विजू इंगळे (दोन्ही रा. हिंगोली), मिलिंद उत्तमराव पाईकराव (रा. सिरसम) यांच्याविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री कांबळे करीत आहेत.

Web Title: Gutkha worth Rs 3 lakh was seized in Hingoli