हिंगोलीत सव्वा तीन लाखांचा गुटख्याचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:28 IST2021-04-13T04:28:15+5:302021-04-13T04:28:15+5:30

हिंगोली शहरातील तलाब कट्टा भागातील एकाच्या घरी गुटख्याचा साठा असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी ...

Gutkha stocks worth Rs | हिंगोलीत सव्वा तीन लाखांचा गुटख्याचा साठा जप्त

हिंगोलीत सव्वा तीन लाखांचा गुटख्याचा साठा जप्त

हिंगोली शहरातील तलाब कट्टा भागातील एकाच्या घरी गुटख्याचा साठा असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी यतीश देशमुख, पोलीस उपनिरीक्षक गंगाधर बनसोडे, जमादार एस. पी. जाधव, जी. व्ही. सोनटक्के, आसेगावकर, मपोशि परविन शहा आदी कर्मचाऱ्यांच्या पथकाने ११ एप्रिल रोजी रात्री ९.५० च्या सुमारास तलाब कट्टा भागातील सागर श्यामराव माने यांच्या घरी छापा टाकला. यावेळी त्याच्या घरात १ लाख ९४ हजार ४८० रुपये किमतीचे विमल पान मसाल्याचे मोठे १०४० पॉकेट, १ लाख २४ हजार ८०० रुपये किमतीचे विमल पान मसाल्याचे लहान १०४० पॉकेट, ६ हजार ८६४ रुपये किमतीचे व्ही-१ तंबाखूचे २०८ पॉकेट, ४ हजार ५७६ रुपये किमतीचे व्ही-१ तंबाखूचे २०८ पॉकेट असा ३ लाख ३० हजार ७२० रुपये किमतीचा साठा आढळून आला. पोलिसांनी रात्री घरातील लाईटच्या प्रकाशात गुटख्याचा पंचनामा केला असून यातील दोन पॉकेट नमुन्यादाखल विश्लेषणास्तव काढून घेत उर्वरित साठा शहर पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक गंगाधर बनसोडे यांच्या फिर्यादीवरून सागर श्यामराव माने (रा. तलाब कट्टा) याच्याविरूद्ध पोलीस उपनिरीक्षक पांडे यांनी गुन्हा नोंद केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शहारे करीत आहेत.

Web Title: Gutkha stocks worth Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.