सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:25 IST2021-01-04T04:25:05+5:302021-01-04T04:25:05+5:30

गांगलवाडी येथे जयंती साजरी हिंगाेली : औंढा नागनाथ तालुक्यातील गांगलवाडी येथील संत नामदेव प्राथमिक आश्रमशाळा व रतनसिंग नाईक माध्यमिक ...

Greetings on the occasion of Savitribai Phule Jayanti | सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन

गांगलवाडी येथे जयंती साजरी

हिंगाेली : औंढा नागनाथ तालुक्यातील गांगलवाडी येथील संत नामदेव प्राथमिक आश्रमशाळा व रतनसिंग नाईक माध्यमिक आश्रमशाळा येथे क्रांतीज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बाळासाहेब पवार, मु. अ. प्रकाश ठाकरे, जी. बी. चव्हाण उपस्थित हाेते.

केंद्रा बु. येथे जयंती साजरी

कहाकर बु. : सेनगाव तालुक्यातील केंद्रा बु. येथील संत ज्ञानेश्वर वाचनालयात क्रांतीज्याेती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच राजेश खंदारे, नारायण डांगे, नागोराव खंदारे, उत्तम कांबळे, ग्रंथपाल सुरेश बल्लाळ, उमेश जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित हाेते. फाेटाे नं. ०२

जिल्हाधिकारी कार्यालयात जयंती साजरी

हिंगाेली : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. फाेटाे नं ०३

Web Title: Greetings on the occasion of Savitribai Phule Jayanti