शिरडची ग्रामसभा अखेर बंदोबस्तात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 00:08 IST2018-02-14T00:08:33+5:302018-02-14T00:08:36+5:30
औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात बारगळलेली ग्रामसभा पुन्हा १२ फेब्रुवारी रोजी सरपंच नंदा ढोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस बंदोबस्तात ग्रामसभा झाली

शिरडची ग्रामसभा अखेर बंदोबस्तात
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात बारगळलेली ग्रामसभा पुन्हा १२ फेब्रुवारी रोजी सरपंच नंदा ढोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस बंदोबस्तात ग्रामसभा झाली.
ग्रामसभेला प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी सोनुने हे उपस्थित होते. सभेची सुरूवात ग्रामविकास अधिकारी एस.एन.मुकणे यांनी विषयाचे वाचन करून केली. तसेच विविध विकास कामांवर चर्चा करण्यात आली. १४ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करणे, स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय बांधकाम करणे आदी विषय घेण्यात आले.
उपस्थित नागरिकांनी गावातील विकास कामे सुरू करावे, अंतर्गत सिमेंट बांधकाम, नाली बांधकाम करणे, सफाई कामगाराचे थकलेले मानधन द्यावे इ. विषयांवर ग्रामसभेतील वातावरण चांगलेच तापले होते.
दरम्यान, सरपंच व ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकाºयांनी उपस्थितांचे प्रश्न ऐकून त्यांचे समाधान करण्यात आले.
ग्रामसभेला गावातील प्रतिष्ठित नागरी माजी सरपंच, उपसरपंच ग्रा.पं. सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, जमादार नेव्हल व त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.