शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

हरभरा आवक दुप्पट वाढली, हिंगोलीत मोंढ्यातील जागा पडतेय अपुरी

By रमेश वाबळे | Updated: March 4, 2024 18:57 IST

पडत्या भावामुळे सोयाबीनची आवक निम्म्याखाली आली आहे.

हिंगोली : येथील मोंढ्यात हरभऱ्याची आवक जवळपास दुपटीने वाढली असून, ४ मार्च रोजी १ हजार १०० क्विंटल हरभरा विक्रीसाठी आला होता. ५ हजार ३३५ ते ५ हजार ८३५ रुपयांदरम्यान भाव मिळाला. आवक वाढल्याने नवा मोंढ्यात जागा अपुरी पडत असल्यामुळे हळद मार्केट यार्डात हरभऱ्याची बीट करण्यात आली. तर, पडत्या भावामुळे सोयाबीनची आवक निम्म्याखाली आली आहे.

यंदा पावसाच्या लहरीपणामुळे सोयाबीन, तूर, कापसाचे उत्पादन घटले. काही भागातील शेतकऱ्यांना लागवडही वसूल झाला नसल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी हरभऱ्यावर भर दिला. जिल्ह्यात यंदा तब्बल १ लाख ५६ हजार ७५० हेक्टरवर शेतकऱ्यांनी हरभऱ्याचा पेरा केला होता. तर, ३६ हजार ४६ हेक्टरवर गव्हाचा पेरा झाला. बहुतांश भागातील हरभऱ्याची काढणी आटोपली असून, शेतकरी आता हरभरा विक्रीसाठी मोंढ्यात आणत आहेत. त्यामुळे आवक दुपटीने वाढली आहे. फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत ४०० ते ५०० क्विंटल हरभरा विक्रीसाठी येत होता. तर, आता एक हजार क्विंटलच्या वर हरभरा विक्रीसाठी येत आहे. तर, दुसरीकडे मात्र पडत्या भावामुळे सोयाबीनची आवक दिवसेंदिवस घटत असल्याचे चित्र आहे.

४ मार्च रोजी १ हजार १०० क्विंटल हरभरा विक्रीसाठी आला होता. ५ हजार ३३५ ते ५ हजार ८३५ रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. आवक वाढल्यामुळे नवा मोंढा भागात हरभरा टाकण्यासाठी जागा अपुरी पडत होती. त्यामुळे बाजार समितीच्या निर्देशानुसार हरभऱ्याची बीट संत नामदेव हळद मार्केट यार्डात करण्यात येत आहे. जोपर्यंत नवी हळद बाजारात येत नाही, तोपर्यंत मार्केट यार्डातच हरभरा खरेदी- विक्रीचे व्यवहार होणार असल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले.

सोयाबीनची दरकोंडी कायम...यंदा उत्पादनात झालेली घट पाहता सोयाबीनला किमान सहा हजाराचा भाव मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला असून, प्रारंभापासून सोयाबीन पडत्या भावात विक्री करावे लागले. भाव वाढ होईल, या आशेवर शेतकऱ्यांनी दोन ते तीन महिने सोयाबीन घरात ठेवले. परंतु, भाव वाढण्याऐवजी घसरले. अजूनही सोयाबीनची दरकोंडी कायम असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे.

हळदीची आवक मंदावली...येथील संत नामदेव मार्केट यार्डात मागील आठवड्यापासून हळदीची आवक मंदावली आहे. सध्या काही भागांत हळद काढणीचे काम सुरू झाले आहे. परंतु, ही हळद बाजारात विक्रीसाठी येण्यासाठी किमान पंधरवडा ते एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे जुनी हळद आहे, ते आता विक्रीसाठी आणत आहेत. नवी हळद काढणीनंतर आवक वाढणार आहे.

सरासरी असा मिळतोय भाव...मोंढ्यात सोमवारी तुरीला सरासरी १० हजार ५० रूपये, सोयाबीन ४ हजार २७०, हरभरा ५ हजार ५८५ तर हळदीला १४ हजार ७५० रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. यंदा सोयाबीन भाववाढीची कोंडी कायम असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

टॅग्स :Hingoliहिंगोलीmarket yardमार्केट यार्ड