गोरेगाव येथील देवीच्या अंगावरील दागिने पळविले; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 23:48 IST2018-01-01T23:48:48+5:302018-01-01T23:48:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गोेरेगाव : येथील भवानी देवीच्या मंदिरात प्रवेश करुन देवीच्या अंगावरील ३५ हजार रुपये किंमतीचे दागिने पळविल्याची ...

गोरेगाव येथील देवीच्या अंगावरील दागिने पळविले; गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
गोेरेगाव : येथील भवानी देवीच्या मंदिरात प्रवेश करुन देवीच्या अंगावरील ३५ हजार रुपये किंमतीचे दागिने पळविल्याची घटना १ जानेवारी रोजी उघडकीस आली. त्यामुळे जुन्या घटनेचा अजून तपास लागलेला नसताना पुन्हा नवीन घटनांचा तपास करण्याचे पोलिसांसमोर आव्हानच आहे.
या भागात पोलिसांचा जराही वचक राहिलेला नसल्याने चो-यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जुन्या घटनेतील चोरटे हाती लागतही नसले तरी नवीन घटना घडत असल्याने गोरेगाव पोलीस कर्मचाºयांच्या कामाबद्दल खरोखरच ग्रामस्थांना शंका येत आहे. चोरट्यांचा शोध घेण्यास अपयश येत असल्याने अनेक जण तर येथे तक्रार करण्याचेही टाळतात. रविवारी मध्यरात्री देवीच्या अंगावरील एकदाणी, मंगळसूत्र, सोन्याचा पाळणा, दोन चांदीचे डोळे असा एकूण ३५ हजार ६३० रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी पळविला आहे. या प्रकरणी रमेश कावरखे यांच्या फिर्यादीवरुन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.