बाप्पांच्या आगमनापूर्वीच शुभवार्ता; हिंगोली जिल्हा कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:36 IST2021-09-10T04:36:46+5:302021-09-10T04:36:46+5:30
हिंगोली : जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून एकही नवा रुग्ण आढळला नाही. तसेच सक्रिय असलेले दोन रुग्णही बरे झाल्याने घरी ...

बाप्पांच्या आगमनापूर्वीच शुभवार्ता; हिंगोली जिल्हा कोरोनामुक्त
हिंगोली : जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून एकही नवा रुग्ण आढळला नाही. तसेच सक्रिय असलेले दोन रुग्णही बरे झाल्याने घरी सोडल्यामुळे जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे.
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत १६ हजार २९ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी १५ हजार ६३७ बरे झाले, तर ३९२ जणांचा मृत्यू झाला आहे. मार्च २०२० पासून कोरोनाचा सुरू असलेला हा कहर मध्यंतरी थोडाबहुत कमी झाला होता. मात्र जानेवारी २०२१ मध्ये कोरोनाची दुसरी लाट आली अन् तिने कहरच केला. पहिल्या लाटेत ३,५१६ रुग्ण एप्रिल ते डिसेंबर २०२१ या कालावधीत आढळले होते. यात सर्वाधिक १,२८५ रुग्ण सप्टेंबर महिन्यात आढळून आले होते, तर याच महिन्यात मृत्यूचा आकडाही १७वर पोहोचला होता, तर लाट ओसरताना डिसेंबर महिन्यात अवघे १५१ रुग्ण आढळले व १ मृत्यू झाला होता. मात्र जानेवारी २०२१ या महिन्यात दुसरी लाट सुरू झाली. २३० रुग्ण या महिन्यात आढळले. तिघांचा मृत्यू झाला. मार्च २०२१ मध्ये २,४५२ रुग्ण आढळले, तर एप्रिल महिन्यात दुसऱ्या लाटेने परमोच्च बिंदू गाठला. तब्बल ६,१८० रुग्ण आढळले. १४२ जणांचा मृत्यू झाला. मेमध्ये लाट ओसरत असतानाही २,९३३ रुग्ण आढळले, तर १२९ जणांचा मृत्यू झाला. जुलैमध्ये ५५ व ऑगस्टमध्ये २९ रुग्ण आढळले. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात एकच रुग्ण आढळला. मात्र या महिन्यात ९ रोजी एकही सक्रिय रुग्ण न राहिल्याने जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे.
सण, उत्सवाच्या तोंडावर काळजी आवश्यक
हिंगोली जिल्हा सध्या कोरोनामुक्त झाला आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर ही खुशखबर जिल्हावासीयांना सुखावणारी आहे. मात्र अजूनही कोरोना संपलेला नाही. प्रवासादरम्यान बाहेरून आलेला कुणी हा आजार पुन्हा येथे पसरवू शकतो. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे तेवढेच गरजेचे आहे. त्याशिवाय गत्यंतर नाही. मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर हे नियम पाळलेच पाहिजे. अन्यथा शासन, प्रशासनाकडून तिसऱ्या लाटेचा दिला जाणारा इशारा प्रत्यक्षात उतरण्याची भीती आहे.
आतापर्यंत आढळलेले रुग्ण १६,०२८
पहिल्या लाटेतील रुग्ण ३,५१६
पहिल्या लाटेतील मृत्यू ५३
दुसऱ्या लाटेतील रुग्ण १२,५१२
दुसऱ्या लाटेतील मृत्यू ३३९
पहिल्या लाटेतील रुग्णसंख्या
महिना आढळलेले रुग्ण मृत्यू
एप्रिल २० २१ ०
मे २०२० १५९ ०
जून ९० ०
जुलै ३८४ ८
ऑगस्ट ७४० १२
सप्टेंबर १२८५ १७
ऑक्टोबर ४०७ १३
नोव्हेंबर २७९ २
डिसेंबर १५१ १
दुसऱ्या लाटेतील रुग्ण व मृत्यू
महिनारुग्णसंख्यामृत्यू
जानेवारी२१ २३० ३
फेब्रुवारी ३६९ ४
मार्च २४५२ ३०
एप्रिल ६१८० १४२
मे २०२१ २९३३ १२९
जून २६३ २१
जुलै ५५ ६
ऑगस्ट २९ ३
सप्टेंबर१०