मैत्रिणीला मारहाण केल्याने भोसकून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:22 IST2018-01-26T00:22:45+5:302018-01-26T00:22:52+5:30
मैत्रिणीला मारहाण का केली म्हणून भावकीतीलच एका युवकाचा खून केल्याची घटना औंढा नागनाथ तालुक्यातील आसोला येथील नवीन वसाहतीत गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली.

मैत्रिणीला मारहाण केल्याने भोसकून खून
जवळा बाजार : मैत्रिणीला मारहाण का केली म्हणून भावकीतीलच एका युवकाचा खून केल्याची घटना औंढा नागनाथ तालुक्यातील आसोला येथील नवीन वसाहतीत गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली.
आसोला येथील किशोर ग्यानोजी कीर्तने (२६) हा जवळा बाजार येथे मजुरीने कामासाठी जातो. तेथे समना आदमाने नावाच्या एका मुलीशी त्याची मैत्रीही होती. ती २४ जानेवारी रोजी आसोला येथे आली होती. किशोर हा जवळ्यात येवून मारहाण करतो, त्याला समजावून सांग असे तिने किशोरची पत्नी सुजाताला सांगितले. तू त्याची मैत्रिण आहेस, मी काय सांगणार, असे म्हणून बराच वेळ सुजाताशी गप्पा झाल्या. सपना रात्रभर किशोरच्याच घरी झोपली. दुसºया दिवशी किशोर जवळयात मजुरीला गेला. तेव्हा जयशीला प्रभाकर कीर्तने यांनी किशोरची आई कमलबाई, सुजाता, सपना यांना घरी जेवायला येण्याचे निमंत्रण दिले. ११ वाजता जेवण करून ते परतले. सुजाता पाणी आणण्यासाठी गेली असता जयशीला कीर्तने यांच्या घराकडे भांडणाचा आवाज येत होता. तेथे किशोर कीर्तने हा जखमी असून त्याच्या पोटातील आतडे बाहेर आल्याचे कमलाबार्इंना दिसून आले. गणेश प्रभाकर कीर्तने याने तू सपना हिस का मारहाण करतो म्हणून म्हणून किशोरच्या पोटात चाकू खुपसल्याचे सुजाता हिने सांगितल्याचे कमलाबाई यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. जखमी किशोरला जवळा बाजार येथे रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत कमलाबाई कीर्तने यांच्या तक्रारीवरून हट्टा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. मयतास एक दोन वर्षांचा मुलगाही आहे.