सामान्य रुग्णालयाची झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 00:19 IST2018-01-28T00:19:16+5:302018-01-28T00:19:21+5:30
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील वाढत्या तक्रारीची दखल घेत प्रजासत्ताक दिनानिमित्त हिंगोली दौºयावर आलेले पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी रुग्णालयास भेट घेऊन येथील समस्यांचा आढावा घेतला.

सामान्य रुग्णालयाची झाडाझडती
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील वाढत्या तक्रारीची दखल घेत प्रजासत्ताक दिनानिमित्त हिंगोली दौºयावर आलेले पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी रुग्णालयास भेट घेऊन येथील समस्यांचा आढावा घेतला.
जिल्हा समान्य रुग्णालयातील समस्यांमुळे येथे उपचारासाठी येणारे रुग्ण हैराण झाले आहेत. एवढेच काय तर रुग्णालयातील शौचालयासह स्वच्छतेचा प्रश्न नेहमीच चर्चेचा असतो. त्यातच अद्याप इमारतीचे कामच पूर्ण झाले नसल्याने उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसेच पाण्याचाही अधून मधून प्रश्न उद्भवत असून येथील डॉक्टरांच्या वेळापत्रकात अद्याप सुधारणा झाली नाही. शिवाय, सुरक्षा रक्षकाचा तर अद्याप कोणी कंत्राट घेतलेलाच नाही. त्यामुळे त्यांच्या वेतनाचाही प्रश्न अनुत्तरितच आहे. या ठिकाणी कायम प्रभारी अधिकाºयांवरच कारभार पाहण्याची वेळ येते. एक पद भरले की, दुसरे रिक्त होते. अथवा कुणीतरी आपल्या गळ्यात ही भानगड नको म्हणून रजा टाकून निघून जाते. हा खेळ खेळण्यातच बहुतांश मंडळी व्यवस्त आहे. तर कारकून मंडळी त्याचा लाभ उचलत आहे. अशा एक ना अनेक समस्या या ठिकाणी सोसाव्या लागत आहेत. आता पालकमंत्र्यानी भेट देऊन पाहणी केल्यानंतर त्या समस्या मार्गी लागून अधिकारी कर्मचारी लक्ष देतील, असा विश्वास रुग्णांना आहे. मात्र पालकमंत्र्यानी दिलेल्या सूचनांचे पालन होते की नाही ? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
पालकमंत्री रुग्णालयास भेट देणार असल्याची कल्पना रुग्णालायतील कर्मचाºयांना लागताच त्यांनी कधी नव्हे, त्या वार्डची कसून स्वच्छता केली होती. तसेच वार्डात रुग्णांची गर्दी नको म्हणून उपचार घेत असलेल्या रुग्णांनाही २५ जानेवारी रोजी सुट्टी दिल्याचे रुग्णातून बोलले जात होते.