गणेशभक्तांनी केले जल्लोषात गणरायाचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:29 IST2021-09-11T04:29:44+5:302021-09-11T04:29:44+5:30
हिंगोली: ‘गणपती बाप्पा मोर’ असा गजर करत जिल्ह्यातील गणेशभक्तांनी शुक्रवारी श्री गणेशाचे जल्लोषात स्वागत केले. श्री गणेश चतुर्थीच्या आदल्या ...

गणेशभक्तांनी केले जल्लोषात गणरायाचे स्वागत
हिंगोली: ‘गणपती बाप्पा मोर’ असा गजर करत जिल्ह्यातील गणेशभक्तांनी शुक्रवारी श्री गणेशाचे जल्लोषात स्वागत केले.
श्री गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरितालिकेलाच काही गणेशभक्तांनी ‘श्री’ ची मूर्ती खरेदी केली होती. हरितालिकेलाच बाजारात गर्दी पहायला मिळाली. शुक्रवारी गणेशमूर्ती आनंदाने जवळ घेत ‘गणपती बाप्पा मोरया’ असा गजर करत श्री गणेशाचे जल्लोषात स्वागत केले. २० रुपयांपासून २ हजार रुपयांपर्यत ‘श्री’ च्या मूर्ती बाजारात विक्रीसाठी आल्या होत्या. शहरातील गांधी चौक, इंदिरा चौक, महावीर चौक, जवाहर रोड आदी वर्दळीच्या भागात गणेश चतुर्थीच्या दिवशी १० ते १५ छोट्या व्यापाऱ्यांनी आपले स्टॉल उघडले होते.
पर जिल्ह्यातील गणेशमूर्ती हिंगोलीत...
कोरोन महामारी लक्षात घेता अनेक व्यापाऱ्यांनी गणेशमूर्ती अमरावती, यवतमाळ, सोलापूर, नांदेड, औरंगाबाद आदी जिल्ह्यांतून मागविल्या होत्या. मागच्या दीड वर्षापूर्वी गणेशमूर्ती मागविल्या होत्या. परंतु, कोरोना महामारीमुळे त्या घरातच ठेवाव्या लागल्या. यावेळेस हिंगोली जिल्हा कोरोना मुक्त झाल्यामुळे व्यापाऱ्यात आनंदाचे वातावरण आहे.
मका कणीस, विड्यांच्या पानांना मागणी
श्री गणेश चतुर्थीला मक्याचे कणीस व विड्यांच्या पानांचा मान असतो. दहा रुपयाला २५ याप्रमाणे विड्यांची पाने आणि दहा रुपयाला एक मक्याचे कणीस विकल्या गेले. डिग्रस, बासंबा, फाळेगाव आदी गावांतील शेतकऱ्यांनी मक्याचे कणीस विक्रीसाठी आणले होते.