शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

गावात तीन जलकुंभ असूनही पाण्यासाठी पायपीट; युवकांचे पाण्यासाठी जलकुंभावर आंदोलन

By रमेश वाबळे | Updated: February 27, 2025 16:44 IST

गावात तीन जलकुंभ ; दुसऱ्यांदा आंदोलनाची वेळ...

हिंगोली : एक नव्हे, दोन नव्हे तर तीन पाणीपुरवठा योजना गावात राबवूनही पाणीटंचाई कमी करण्यात प्रशासनाला यश येत नसल्याने औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव (सोळंके) येथे युवकांनी चक्क जलजीवन मिशन अंतर्गत बांधण्यात आलेल्या कोरड्या जलकुंभावर चढून २७ फेब्रुवारी रोजी आंदोलन केले.

औंढा नागनाथ तालुक्यात असलेल्या येहळेगाव (सोळंके) येथे गावातील काही युवकांनी २७ फेब्रुवारी रोजी सकाळी गावातील पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन सुरू केले आहे. गावात पाणी मिळत नसल्याने लोकांनी अगोदरच जिल्हा प्रशासनाला ही बाब कळवली होती. परंतु, कुठली दखल घेतली गेली नसल्याने युवकांनी हे आंदोलन सुरू केले आहे. विशेष म्हणजे जलजीवन मिशन अगोदर गावात दोन योजनेंतर्गत पाण्याच्या टाक्या उभारण्यात आलेले आहेत. परंतु, एकही टाकी लोकांच्या तहान भागविण्यासाठी कामी पडत नाही. शिवाय गावातील ही पाणीटंचाई दूर करण्यासाठी ग्रामपंचायत देखील फारसे लक्ष देत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई नित्याचीच झाली आहे. ग्रामपंचायतीवर वर्चस्व कुणाचेही असो पण टंचाईचा हा प्रश्न मिटत नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

मागील काही वर्षांपूर्वी येथे अशाच पद्धतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर युवकांना चक्क अमरण उपोषण करावे लागले होते. आता पुन्हा ग्रामस्थांवर पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे आंदोलन करण्यात यावेळी काही विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पुढे आहेत.

गावात तीन जलकुंभ ; दुसऱ्यांदा आंदोलनाची वेळ...औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव सोळंके येथील पाणी प्रश्न सुटण्याचे नाव घेत नाही. गुरुवारी सुरू झालेल्या आंदोलनापूर्वी देखील ग्रामपंचायत कार्यालयासमोर मागील काही वर्षांपूर्वी युवकांना असेच आंदोलन करून टँकरद्वारे पाणीपुरवठा करून घ्यावा लागला होता. आता पुन्हा युवकांना या प्रश्नासाठी पुढे यावे लागले आहे.

तहसीलदारांच्या मध्यस्थीने युवकाचे आंदोलन मागे...येहळेगाव (सोळंके) येथे युवकांनी सुरू केलेले आंदोलन याची माहिती मिळतात औंढा नागनाथ तहसीलदार हरीश गाडे यांनी तातडीने गावात येऊन भेट दिली. यावेळी हिंगोली जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंते नरवाडे, अभियंता बोरकर यांची उपस्थिती होती. युवकांना लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले, अशी माहिती शुभम सोळंके यांनी दिली.

टॅग्स :Waterपाणीagitationआंदोलन