वीजपुरवठा वारंवार खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:22 IST2020-12-27T04:22:03+5:302020-12-27T04:22:03+5:30

शेतशिवारात वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा शेतशिवारात वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. या भागात लावण्यात आलेल्या हरभरा ...

Frequent power outages | वीजपुरवठा वारंवार खंडित

वीजपुरवठा वारंवार खंडित

शेतशिवारात वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला

बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा शेतशिवारात वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. या भागात लावण्यात आलेल्या हरभरा व गहू पिकांवर वन्यप्राणी हल्ला करुन नासाडी करीत आहेत. या भागातील तुरीचे बरेच पीक उधळल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. आता वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

सांडपाणी रस्त्यावर साचले

साखरा : सेनगाव तालुक्यातील साखरा गावात नाल्या नसल्याने अनेक नागरिकांच्या घरातील सांडपाणी गावाच्या रस्त्यावर जमा होत आहे. गावात रस्ते बरोबर नसल्याने नाल्याही केलेल्या नाहीत. ज्या ठिकाणी नाल्या आहेत, त्याठिकाणचे सांडपाणी नाल्यामध्ये बरोबर जात नाही. यासाठी गावात नाल्या करून सांडपाण्याचा प्रवाह बरोबर नाल्यात करून देण्याची मागणी गावकरी करीत आहेत.

गावातील बोअरवेल पडली बंद

कडोळी : सेनगाव तालुक्यातील कडोळी गावातील बोअरवेल बंद पडली आहे. सदररल बोअरवेल मागील ५ महिन्यांपासून बंद असल्याने गावकऱ्यांना हिवाळ्यातच पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. बोअरवेल बंद असल्याची तक्रार वारंवार गावातून होत असून याकडे ग्रामपंचायतीच्या प्रशासक व ग्रामसेवकाने दुर्लक्ष केले आहे. यासाठी वरिष्ठांनी लक्ष देऊन गावातील बोअरवेल सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

हिंगोली : शहरातील वीजपुरवठा मागील दोन महिन्यांपासून खोळंबला आहे. शहरातील अनेक नगरांतील वीजपुरवठा सकाळी व रात्रीच्या सुमारास वारंवार खंडित होत आहे. यामध्ये सावरकरनगर, सरस्वतीनगर, आंबेडकरनगर, जिजामातानगर, शाहूनगर व कमलानगर भागांचा समावेश आहे. या नगरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने या भागातील नागरिकांत महावितरणच्या कारभाराविषयी रोष निर्माण झाला आहे.

जवळा - पळशी रस्ता रखडला

हिंगोली : शहरातून जाणारा जवळा - पळशी रस्ता हा पूर्णत: रखडला आहे. या रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. शहरातील अनेक नागरिक या रस्त्यावर सकाळी फिरण्यासाठी जात असतात, पण रस्त्याच्या दुरवस्थेचा त्रास या नागरिकांना होत आहे. यासाठी संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

अंभेरी - चिंचोली रस्त्यावरील गिट्टी पडली उघडी

हिंगोली : तालुक्यातील अंभेरी - चिंचोली रस्ता उखडला आहे. यामुळे या रस्त्यावरील गिट्टी उघडी पडली आहे. तसेच या रस्त्याचा त्रास वाहनधारकांसह प्रवाशांना होत आहे. हा रस्ता एवढ्या मोठ्या प्रमाणावर उखडला आहे की, त्यामुळे या मार्गावरील बससेवाही बंद केली आहे. गावातील लोकप्रतिनिधींंनी लक्ष देऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी गावकरी करीत आहेत.

Web Title: Frequent power outages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.