चार लाख नागरिकांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:35 IST2021-09-04T04:35:29+5:302021-09-04T04:35:29+5:30
हिंगोली : जिल्ह्यात ३० नियमित व उपकेंद्र स्तरावर लोकसंख्येनुसार लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. आतापर्यंत चार लाख लोकांनी ...

चार लाख नागरिकांनी घेतली लस
हिंगोली : जिल्ह्यात ३० नियमित व उपकेंद्र स्तरावर लोकसंख्येनुसार लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. आतापर्यंत चार लाख लोकांनी लसीकरण करून घेतल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
जिल्ह्यात कोविड लसीकरण सुरू आहे. लसीकरण केंद्राच्या ठिकाणी, नोंदणी, पडताळणी, लसीकरण, निरीक्षण व प्रतिक्षालय असे कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. शुद्ध पिण्याचे पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्तींकरिता व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लसीकरण केंद्रावर कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन अशा दोन प्रकारच्या लसी देण्यात येत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ग्रामीण भागातील चार लाख लोकांनी पहिला व दुसरा डोस घेतला आहे. दरम्यान, लसीकरणाबाबत कलापथक, बॅनर, पोस्टर्स, पाम्पलेट, होर्डिंग, चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती केली जात असून, जिल्ह्यातील सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी केले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. सचिन भायेकर, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी कैलास शेळके, आदी यासाठी पुढाकार घेत आहेत.