शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

खून प्रकरणातील चार आरोपी जेरबंद; एक फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:56 IST

: लग्नाचा प्रस्ताव अमान्य केल्याने मुलीच्या पित्याचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना सेनगाव तालुक्यातील दाताडा बु. येथे शुक्रवारी रात्री ७.३० वाजता घडली. समाजात बदणामी झाल्याचा राग मनात धरून आरोपींनी मुलीच्या पित्याची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील चार आरोपींना सेनगाव पोलिसांनी रविवारी जेरबंद केले असून एक आरोपी फरार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : लग्नाचा प्रस्ताव अमान्य केल्याने मुलीच्या पित्याचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना सेनगाव तालुक्यातील दाताडा बु. येथे शुक्रवारी रात्री ७.३० वाजता घडली. समाजात बदणामी झाल्याचा राग मनात धरून आरोपींनी मुलीच्या पित्याची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील चार आरोपींना सेनगाव पोलिसांनी रविवारी जेरबंद केले असून एक आरोपी फरार आहे.दाताडा बु. येथील कैलास माणिकराव शिंदे यांची कोमल या मुलीस गावातील सचिन नारायण सुरनर याने लग्नाची मागणी घातली होती. पंरतु सचिन हा व्यसनाधीन असल्यामुळे तसेच त्याचा स्वभावही वाईट असल्याने तसेच एका समाजाचे असून बेटी व्यवहार नसल्याने हे स्थळ शिंदे यांनी नाकारले होते. हाच राग मनात धरून ९ आॅक्टोबर भाऊबीजच्या दिवशी सायंकाळी ७.३० वाजता गावातील मारोती मंदिराजवळ सचिन नारायण सुरनर, किरण नारायण सुरनर यांनी गुप्तीने व काठीने तर नितीन विश्वनाथ कवडे, विश्वनाथ नामदेव कवडे या दोघांनी लाथा-बुक्यांनी मारहाण केली.या मारहाणीत कैलास शिंदे यांच्या पोटात चाकूचे खोलवर वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. तसेच कैलास शिंदे यांचे चुलत भाऊ भूजंग धोंंडबाराव शिंदे यांनाही चाकूचे गंभीर वार करीत मारहाण केली होती. मारहाणीत कैलास शिंदे (४५) यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.सचिन सुरनर, किरण सुरनर, नितीन कवडे, विश्वनाथ कवडे या चार आरोपींना ११ नोव्हेंबर रोजी सेनगाव पोलिसांनी अटक केली. तर गणेश कवडे हा आरोपी फरार असल्याचे पोउपनि बाबूराव जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी