सेनगावात दिगंबर जैन मंदिराचा शिलान्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:56 IST2021-02-05T07:56:00+5:302021-02-05T07:56:00+5:30

शहरात जैन समाजाच्या वतीने मुनिश्री १००८ योगसागर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन महावीर दिगंबर जैन मंदिराचे काम हाती घेण्यात ...

Foundation stone of Digambar Jain Temple at Sengaon | सेनगावात दिगंबर जैन मंदिराचा शिलान्यास

सेनगावात दिगंबर जैन मंदिराचा शिलान्यास

शहरात जैन समाजाच्या वतीने मुनिश्री १००८ योगसागर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन महावीर दिगंबर जैन मंदिराचे काम हाती घेण्यात आले. या मंदिराच्या पायाभरणी व शांती विधान पूजा कार्यक्रम २७ व २८ जानेवारी रोजी दोन दिवस पार पडला. या कार्यक्रमाला मुनिश्री १००८ अक्षय सागर महाराज यांच्यासह मुनिश्री १०८ सागर महाराज, मुनिश्री १०८ नेमी सागरजी, मुनिश्री १०८ अतुलसागर, मुनिश्री १०८ निसिम्मसागर, मुनिश्री १०८ स्वासतसागर, मुनिश्री १०५ शमताभुषजी महाराज आदी सात मुनिश्री उपस्थित होते. यावेळी अभिषेक शांतीधारा, ज्ञान कल्याण महोत्सव, शांतीविधान पूजा भव्य शिलान्यास पूजन व मंगल प्रवचन कार्यक्रम पार पडला. या दोन दिवसीय कार्यक्रमाला शहरातील व परिसरातील मोठ्या संख्येने जैन समाज बांधव सहभागी झाले होते. फोटो २० नंबर

Web Title: Foundation stone of Digambar Jain Temple at Sengaon