त्यांच्यासमवेत वसमतचे माजी उपनगराध्यक्ष रियाजुद्दीन कुरेशी,माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल सातपुते,माजी नगरसेवक मुन्ना मशहूर, पंचायत समिती सदस्य बालाजी बोडखे, शेख इलियास, विठ्ठलराव पटवे, कृष्णा दावलबाजे, गोपाल मेटे, स. ईरफान, जावेद फारुखी, शेख उमर यांनीही काँग्रेस प्रवेश केला. यावेळी माजी आमदार संतोष टारफे, प्रदेश सरचिटणीस अ. हाफिज, जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे-पाटील, प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ हत्तीअंबीरे, विनायकराव देशमुख, प्रशांत गायकवाड, अजगर पटेल, केशव नाईक, विलास गोरे, प्रीती जैस्वाल, रमेश जाधव, सुधीर राठोड, सुमेध मुळे, शेख अलीमोदीन, जुबेर मामू, बंटी नागरे, संदीप गोबाडे हे उपस्थित होते. हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईत नाना भाऊ पटोले यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडला. पटोले म्हणाले की, मुनीर पटेल यांनी मागील अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रांत अतिशय प्रामाणिकपणे काम केले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात त्यांना योग्य तो सन्मान व ताकद देण्यात येईल. तर हिंगोली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला बळकटी देण्याचे काम प्रामाणिकपणे करू, अशी ग्वाही मुनीर पटेल यांनी यावेळी दिली.
माजी सभापती मुनीर पटेल काँग्रेसमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:36 IST