हिंगोलीच्या माजी आमदार आशाताई टाले यांचे निधन (सुधारित)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:30 IST2021-01-23T04:30:24+5:302021-01-23T04:30:24+5:30

माजी आमदार आशाताई टाले या तात्कालीन मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या काळात १९६४ ते १९७२ या काळात ...

Former Hingoli MLA Ashatai Tale passes away | हिंगोलीच्या माजी आमदार आशाताई टाले यांचे निधन (सुधारित)

हिंगोलीच्या माजी आमदार आशाताई टाले यांचे निधन (सुधारित)

माजी आमदार आशाताई टाले या तात्कालीन मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या काळात १९६४ ते १९७२ या काळात विधान परिषदेवर आमदार होत्या, तर १९७२ ते १९७८ या काळात त्या हिंगोली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार होत्या, हिंगोली काँग्रेेस पक्षाच्या पहिल्या महिला आमदार म्हणून सर्वत्र त्यांची ओळख होती. मराठवाडा विकासाच्या नावाखाली झालेल्या विविध आंदोलनात प्रत्यक्ष त्या सहभागी होत होत्या, हिंगोली शहरातील तीव्र पाणीटंंचाईचा प्रश्न त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या कार्यकाळात प्रतिष्ठेचा करून सोडवला होता. त्यांच्या प्रयत्नामुळे सिद्धेश्वर धरणातून शहराला पाणीपुरवठा योजना त्यांच्या काळात कार्यान्वित झाली. हीच हिंगोलीवासियांसाठी त्यांच्या कार्याची खरी ओळख मानली जाते. त्यांच्या पश्चात सून, दोन नात देवेंद्र व शेलैस असा परिवार आहे.

फोटो ७ नंबर (पासपोर्ट)

Web Title: Former Hingoli MLA Ashatai Tale passes away