हिंगोली शहरात मास्कचा पडला विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:24 IST2020-12-25T04:24:22+5:302020-12-25T04:24:22+5:30
हिंगोली: जिल्ह्यात रोज कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना नगर परिषद व पोलिसांनी संयुक्तरित्या सुरू केलेली ‘मास्क बंधनकारक’ ही ...

हिंगोली शहरात मास्कचा पडला विसर
हिंगोली: जिल्ह्यात रोज कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना नगर परिषद व पोलिसांनी संयुक्तरित्या सुरू केलेली ‘मास्क बंधनकारक’ ही मोहीम थंडबस्त्यात पडलेली पहायला मिळत आहे.
डिसेंबर महिन्यातील पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात शहरातील गांधी चौक, महावीर चौक, इंदिरा चौक, नांदेड नाका, वाशिम रोड, औंढा रोड आदी भागांत नगरपरिषद व पोलीस विभागाच्या वतीने नागरिकांना तसेच वाहनचालकांना सक्तीचे केले होते. या दरम्यान, मास्क न घालणाऱ्यांना दंडही आकारला होता. परंतु, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ही मोहीम थंडावलेली पहायला मिळत आहे. सध्या नागरिक खुलेआम रस्त्याने फिरत आहेत. २३ डिसेंबर रोजी जिल्ह्यात कोरोनाच्या सात रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, असे असतानाही नागरिक मात्र तोंडाला मास्क न बांधता बाजारात फिरत आहेत.