शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

गोरगरीबांसाठीचे अन्नधान्य किट परस्पर लांबवले; नगराध्यक्षांसह १२ नगरसेवकांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 18:39 IST

औंढा नागनाथ येथील नागनाथ संस्थानने कळमनुरी नगरपालिकेला ५00 किट पाठविल्या होत्या.

ठळक मुद्देचौकशीत नगराध्यक्षांसह बारा नगरसेवक व प्रशासनावरही ठपका ठेवला होता.  न.प. कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केल्याने दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे

कळमनुरी : औंढा नागनाथ येथील नागनाथ संस्थानकडून गोरगरिबांना वाटण्यासाठी आलेल्या किट पालिका प्रशासनाच्या परवानगीविना परस्पर घेवून गेल्या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात नगराध्यक्षासह १२ नगरसेवकांविरूद्ध ७ आॅगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणात अखेर कारवाई झाली.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या टाळेबंदीमुळे २0 एप्रिल रोजी औंढा नागनाथ येथील नागनाथ संस्थानने कळमनुरी नगरपालिकेला ५00 किट पाठविल्या होत्या. त्या नगरपालिकेने उतरवून घेतल्या. मात्र त्या किट वाटपाबाबत प्रशासनाकडून कारवाई होणे अपेक्षित असताना नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी त्या किट परस्पर नेल्या. यासाठी न.प. कर्मचाऱ्यांवरही दबाव आणला होता. याबाबत तक्रारी झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी चौकशीही केली होती. मात्र चौकशीत नगराध्यक्षांसह बारा नगरसेवक व प्रशासनावरही ठपका ठेवला होता. 

प्रशासनातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करून मुख्याधिकाऱ्यांच्या चौकशीचा प्रस्ताव पाठविण्याचा आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढला होता. मात्र नंतर न.प. कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केल्याने तो मागे घेतला गेला. नगराध्यक्षांसह नगरसेवक शिवसेनेचे असल्याने सत्ताधाऱ्यांना प्रशासनाकडून अभय दिले जात असल्याचा आरोपही होत होता. त्यानंतर हे प्रकरण मूळ तक्रारदार नंदकिशोर तोष्णीवाल यांनी उच्च न्यायालयात दाखल केले होते. त्यानंतर पुन्हा कारवाईचे आदेश दिले होते. 

या प्रकरणात ७ आॅगस्ट रोजी मुख्याधिकारी  उमेश कोठीकर यांनी कळमनुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे, उपनगराध्यक्ष चंद्रकांत देशमुख, नगरसेवक रत्नमाला कऱ्हाळे, आप्पाराव शिंदे, मीरा डुरे, सुमनबाई बेंद्रे, राजू संगेकर, शंकुतलाबाई बुर्से, पार्वतीबाई पारवे, संतोष सारडा, सविता सोनुने, शेख सईदा यांच्याविरूध्द कलम १८६, १८८, २६९, ३४ भादंवि सह कलम ५१(क)(ख) ५३ आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम १३५ म़पोक़ायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ 

नोटीस देऊनही किट परत केल्या नाहीतफिर्यादीत म्हटले की, आरोपीतांनी संगनमत करून औंढा संस्थानकडून  २0 एप्रिलच्या पत्रान्वये  गरीब, कष्टकरी, मजूर अशा गरजू लोकांच्या दैनंदिन अन्नाची गरज भागविण्याकरिता अन्नधान्याच्या एकूण ५०० किट प्राप्त झाल्या होत्या. त्याच्या वाटपाबाबत कोणताही आदेश नसताना व जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी व कोरोना विषाणू प्रतिबंधसंदर्भात आदेश असताना आरोपीतांनी नगरपालिका क़र्मचाऱ्यांवर दबाव टाकून २३ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता नगरपालिका क़ार्यालय हॉलमधून ५०० किट घेवून गेले़ या किट परत करण्याबाबत संबंधितांना नोटिसा बजावूनही किट जमा केल्या नाहीत़  पुढील तपास सपोउपनि आऱपी़जाधव हे करीत आहेत़

टॅग्स :fraudधोकेबाजीHingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारीcorona virusकोरोना वायरस बातम्या