विवाहितेच्या छळप्रकरणी पाच जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:53 IST2021-02-05T07:53:09+5:302021-02-05T07:53:09+5:30
शाळेतील विज्ञान साहित्य लंपास कळमनुरी : येथील जिल्हा परिषद प्रशालेतील विज्ञान प्रयोगातील साहित्य चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ५ ...

विवाहितेच्या छळप्रकरणी पाच जणांवर गुन्हा
शाळेतील विज्ञान साहित्य लंपास
कळमनुरी : येथील जिल्हा परिषद प्रशालेतील विज्ञान प्रयोगातील साहित्य चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ५ जानेवारीच्या मध्यरात्री घडली. याप्रकरणी मुख्याध्यापक मनोज मोगले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला आहे.
चोरट्यांनी शाळेचा दरवाजा, कडीकोंडा तोडून शाळेत प्रवेश केला. त्यानंतर ४४ हजार ९२५ रुपये किमतीचे विज्ञान प्रयोगाचे साहित्य लंपास केले. तपास पोना ए.एम. शेळके करीत आहेत.
बोअरच्या पाण्यावरून मारहाण
कळमनुरी : शेतातील बोअरच्या पाण्यावरून एकाला शिवीगाळ करून थापडबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना येडूत येथे ३० जानेवारीच्या दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. सविता घुगे यांच्या फिर्यादीवरून शशीकला घुगे, सुभाष घुगे यांच्याविरुद्ध कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पवन चाटसे करीत आहेत.