अखेर जि.प. शिक्षकांना पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:21 IST2021-07-01T04:21:39+5:302021-07-01T04:21:39+5:30

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष गणाजी बेले, तर उद्घाटक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांची उपस्थिती होती. यावेळी ...

Finally, Z.P. Distribution of awards to teachers | अखेर जि.प. शिक्षकांना पुरस्कारांचे वितरण

अखेर जि.प. शिक्षकांना पुरस्कारांचे वितरण

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष गणाजी बेले, तर उद्घाटक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांची उपस्थिती होती. यावेळी मंचावर उपाध्यक्ष मनीष आखरे, सभापती फकिरा मुंडे, माजी सभापती संजय देशमुख, एकलारे, भगवान खंदारे, शिक्षणाधिकारी पी.बी. पावसे, संदीपकुमार सोनटक्के यांची उपस्थिती होती. यावेळी प्राथमिक शिक्षक सुनीता रामा खुडे, ऊर्मिला भिकय्या कीर्तनकार, सुरेश राजाराम पांचाळ, रेणुका चंद्रकांत पांचाळ, प्रकाश गंगाराम घ्यार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला तर माध्यमिकमधून गणेश राजाराम सोनावणे, विलास गोपा जाधव, रमेश नाथराव चव्हाण यांना व विशेष शिक्षक म्हणून करुणा मारोतीराव येवले यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले तर शिक्षकांनी चांगले काम केल्याने ते पुरस्काराचे धनी झाले. याप्रमाणेच सर्वांनी काम करून जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख उंचवावा, असे आवाहन करण्यात आले.

Web Title: Finally, Z.P. Distribution of awards to teachers