अखेर नगरपंचायतने बुजविला खड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:18 IST2021-01-13T05:18:46+5:302021-01-13T05:18:46+5:30

औंढा नागनाथ शहरातील बसस्थानकसमाेर माेठा खड्डा पडला हाेता. यामुळे रात्रीच्या सुमारास अनेक वेळा अपघात घडला हाेता. यासंदर्भात ‘लाेकमत’ने वृत्त ...

Finally, the Nagar Panchayat filled the gap | अखेर नगरपंचायतने बुजविला खड्डा

अखेर नगरपंचायतने बुजविला खड्डा

औंढा नागनाथ शहरातील बसस्थानकसमाेर माेठा खड्डा पडला हाेता. यामुळे रात्रीच्या सुमारास अनेक वेळा अपघात घडला हाेता. यासंदर्भात ‘लाेकमत’ने वृत्त प्रकाशित करताच नगरपंचायतने दाखल घेऊन हा खड्डा शनिवारी बुजविला आहे. असे असले तरीही अजून अनेक ठिकाणी नळयोजना जागोजागी लिकेज आहे. हे पाणी अजूनही या रस्त्यावरून वाहत असल्याने कामात अडथळा निर्माण हाेत आहे. तसेच ये-जा करणाऱ्या प्रवाशांना याचा माेठा त्रास सहन करावा लागत आहे.

औंढा शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी मुख्य पाइपलाइन ६० वर्ष जुनी आहे. रस्त्याच्या मधोमधून ही पाइपलाइन गेली आहे. त्यामुळे अनेक व्यवसायिकांनी रस्त्यात खड्डे करून पाणी पुरवठा करून घेतला आहे. या रस्त्यावर अनेक अवजड वाहनांची ये- जा असल्याने जुनी पाइपलाइन जागोजागी फुटली आहे. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे करणाऱ्या वाहनांना खड्ड्यांचा मोठा त्रास होत असून बाजूने काम चालू असल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण होत होती; परंतु हा खड्डा आता बुजविण्यात आला आहे.

Web Title: Finally, the Nagar Panchayat filled the gap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.