शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत फिल्मी स्टाइल चोरी; लाखोंची रोकड असलेली बँकेची तिजोरी, सीसीटीव्हीसह लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 16:32 IST

कुरुंदा येथे मध्यवर्ती बँक शाखेची तिजोरीच चोरट्यांनी पळविली

कुरुंदा (जि. हिंगोली) : वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेची तिजोरी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी फिल्मस्टाइल पळविली. या तिजोरीतून सात लाख रुपयांची रक्कम लंपास झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, तिजोरीबरोबर सीसीटीव्ही कॅमेरेही पळविले गेले आहेत. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे.

१८ जानेवारी रोजी मध्यरात्री कुरूंदा बँक शाखेचे मुख्य शटर वाकवून चोरटे आत घुसले. यानंतर चोरट्यांनी बँकेतील तिजोरी पळविली. चोरट्यांनी पळविलेल्या तिजोरीत जवळपास सात लाख रुपये रक्कम असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती कळताच पोलिस अधीक्षक कृष्णकांत कोकाटे, उपविभागीय अधिकारी अंबादास भुसारे, गुन्हे अन्वेषण विभागाचे घेवारे, सहायक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे आदिंनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी श्वान पथक, ठसेतज्ज्ञांना पाचरण करण्यात आले होते. चोरी करणारी ही टोळी सराईत असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, चोरीच्या तपासासाठी पथक नियुक्त करण्यात आले आहे. गावातील तसेच इतर मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जाणार आहेत, असेही पोलिसांनी सांगितले. शनिवारी मध्यरात्री चोरी झाली. परंतु, हा प्रकार रविवारी सकाळी निदर्शनास आला. फिल्मी स्टाइल चोरीच्या घटनेमुळे गावात घबराट पसरली आहे. या घटनेप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

तिजोरी चोरी प्रकरणी गुन्हा दाखलवसमत तालुक्यातील कुरुंदा येथील परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेतील तिजोरी पळविल्याप्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात दुपारी ४:१८ वाजेदरम्यान पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर तिजोरीत ७ लाख १८ हजार ४६० रुपये होते. चोरट्यांनी तिजोरी पळविल्याप्रकरणी परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखाधिकारी तेजेराव पाटील यांनी कुरुंदा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारी