पाण्याची मोटा लावण्यावरून दोन गटांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:32 IST2021-09-21T04:32:39+5:302021-09-21T04:32:39+5:30

गोपाल अशोकराव शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, तू आमच्याअगोदर मोटार का लावत आहेस, या कारणावरून आरोपींनी शिवीगाळ करून ...

Fighting in two groups over waterlogging | पाण्याची मोटा लावण्यावरून दोन गटांत हाणामारी

पाण्याची मोटा लावण्यावरून दोन गटांत हाणामारी

गोपाल अशोकराव शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, तू आमच्याअगोदर मोटार का लावत आहेस, या कारणावरून आरोपींनी शिवीगाळ करून थापडाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गोपाल शिंदे यांच्या फिर्यादीवरून प्रल्हाद आनंदराव शिंदे, वैभव प्रल्हाद शिंदे यांच्याविरुद्ध नोंद घेण्यात आली. तर प्रल्हाद आनंदराव शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, विहिरीवरील पाण्याची मोटार लावली असता दोघांनी पाण्याचा वॉल बंद केला. तसेच बुक्क्याने मारहाण केली. तर इतर दोघांनी जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी प्रल्हाद शिंदे यांच्या फिर्यादीवरून अशोकराव आनंदराव शिंदे, गोपाल अशोकराव शिंदे, पंडित आनंदराव शिंदे, गुलाब पंडितराव शिंदे यांचेविरुद्ध कळमनुरी पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. तपास पोलीस नाईक घ्यार करीत आहेत.

Web Title: Fighting in two groups over waterlogging