शेतीच्या वादातून दाेन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:21 IST2021-06-25T04:21:45+5:302021-06-25T04:21:45+5:30

हिंगोली : वडिलांना शिवीगाळ का केली?, तसेच शेती का घेतली? या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना परभणी तालुक्यातील ...

Fighting in the Daen group over an agricultural dispute | शेतीच्या वादातून दाेन गटात हाणामारी

शेतीच्या वादातून दाेन गटात हाणामारी

हिंगोली : वडिलांना शिवीगाळ का केली?, तसेच शेती का घेतली? या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना परभणी तालुक्यातील सुकापूरवाडी येथे २३ जून रोजी सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात परस्पराविरुद्ध पाचजणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

भारत दादाराव कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोविंद लिंबाजी कदम, सुधाकर दादाराव कदम यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. तुम्ही माझ्या वडिलांना शिवीगाळ का केली, असे विचारले असता एकाने हात पकडून दुसऱ्याने काठीने डोके फोडले. तसेच आरोपींनी शिवीगाळ केल्याचे भारत कदम यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दुसरी फिर्याद सुधाकर रंगराव कदम यांनी दिली.

याप्रकरणी भारत ऊर्फ राजेश दादाराव कदम, छत्रगुण दादाराव कदम, दादाराव रंगराव कदम यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. शेती का घेतली, या कारणावरून आरोपींनी शिवीगाळ करून काठीने डोके फोडले. तसेच शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे सुधाकर कदम यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दोन्ही घटनांचा तपास पो.ना. माणिक डुकरे करीत आहेत.

Web Title: Fighting in the Daen group over an agricultural dispute