हिरडी येथे दोन गटांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:20 IST2021-07-04T04:20:39+5:302021-07-04T04:20:39+5:30

या प्रकरणी विशाल सुधाकर मोरे यांच्या फिर्यादीवरून संतोष दगडू पठाडे, संदीप दगडू पठाडे, सुजाता संतोष पठाडे, मीना ...

Fighting between two groups at Hirdi | हिरडी येथे दोन गटांत हाणामारी

हिरडी येथे दोन गटांत हाणामारी

या प्रकरणी विशाल सुधाकर मोरे यांच्या फिर्यादीवरून संतोष दगडू पठाडे, संदीप दगडू पठाडे, सुजाता संतोष पठाडे, मीना संदीप पठाडे यांच्याविरुद्ध बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. गावात परत का आला, असे म्हणून आरोपींनी घरात घुसून डोक्यात काठीने मारहाण केल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत विशाल मोरे यांनी म्हटले आहे. तर मीनाक्षी संदीप पठाडे यांच्या फिर्यादीवरून शीलाबाई सुधाकर मोरे, मीनाबाई सुधाकर मोरे, सुधाकर शिवाजी मोरे, विशाल सुधाकर मोरे यांच्याविरुद्ध बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. लहान मुलगा आमच्याकडे पाहून का थुंकला, या कारणावरून आरोपींनी मारहाण केल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत मीनाक्षी पठाडे यांनी म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास स.पो.नि. राजेश मलपिलू यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय मगन पवार करीत आहेत.

Web Title: Fighting between two groups at Hirdi