किरकोळ कारणावरून तुंबळ हाणामारी; परस्पर तक्रारीवरून बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:24 IST2020-12-26T04:24:06+5:302020-12-26T04:24:06+5:30
कळमनुरी तालुक्यातील बेलमंडळ येथे २४ डिसेंबर रोजी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून तुंबळ हाणामारी झाली. यात अश्विनी कृष्णराव ...

किरकोळ कारणावरून तुंबळ हाणामारी; परस्पर तक्रारीवरून बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
कळमनुरी तालुक्यातील बेलमंडळ येथे २४ डिसेंबर रोजी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून तुंबळ हाणामारी झाली. यात अश्विनी कृष्णराव मुधळ यांच्या फिर्यादीनुसार पाच ते सहा जण गैरकायद्याची मंडळी जमवून हातात तलवार, काठ्या घेऊन फिर्यादीला मारहाण केली. लाठ्या-काठ्या, शस्त्रांनी दहशत निर्माण केली. फिर्यादी महिलेला तू कोणासोबत पाच दिवस निघून गेली होतीस अशी बदनामी करून फिर्यादी व तिच्या नवऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली. तू पोलीस स्टेशनला गेलीस तर तुझ्या गाडीसकट उडवून देऊ, अशी जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अरविंद कामनराव मुधोळ, गडद अरविंद मुधोळ, ज्योती अरविंद मुधोळ, विजय प्रकाशराव मुधोळ, राजू प्रकाशराव मुधोळ, सर्व रा. बेलमंडळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर परस्परविरोधी तक्रारीनुसार अरविंद कामनराव मुधोळ यांच्या फिर्यादीनुसार २४ डिसेंबर रोजी रात्री साडेसहा ते सात वाजण्याच्या सुमारास काही जण गैरकायद्याची मंडळी जमवून, लाठ्या-काठ्या, लोखंडी गज घेऊन घरात घुसले. फिर्यादी व त्याच्या पत्नीला मारहाण करून शिवीगाळ केली. जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी ज्ञानेश्वर बाबूराव मुधोळ, कृष्णा बाबूराव मुधोळ, तुकाराम बापूराव मुधोळ, अनिता ऊर्फ अश्विनी कृष्णा मुधोळ, कौशल्याबाई बाबूराव मुधोळ, सूरज तुकाराम मुधोळ, शुभम् तुकाराम मुधोळ, सर्व रा. बेलमंडळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार रवी हुंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार मधुकर नागरिक करीत आहेत.