बँडताशांच्या गजरात बसविले शेतातील विद्युत राेहित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:25 IST2021-01-02T04:25:14+5:302021-01-02T04:25:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सवड : हिंगोली तालुक्यातील सवड येथील शेतकऱ्यांनी शुक्रवार, दिनांक १ जानेवारी राेजी एक महिन्यानंतर मिळालेले ...

बँडताशांच्या गजरात बसविले शेतातील विद्युत राेहित्र
लोकमत न्यूज नेटवर्क
सवड : हिंगोली तालुक्यातील सवड येथील शेतकऱ्यांनी शुक्रवार, दिनांक १ जानेवारी राेजी एक महिन्यानंतर मिळालेले विद्युत राेहित्र बँडताशांच्या गजरात सवड शेतशिवारात नेले.
सवड येथील शेतशिवारात बसविण्यात आलेले विद्युत राेहित्र सतत जळत असल्याने शेतकरी त्रस्त झाले हाेते. यामुळे पिकांना पाणी देण्यात अडथळा येत होता. एका महिन्यात तीनवेळा राेहित्र जळल्याने रब्बीतील पिके धाेक्यात आली हाेती. येथील शेतकऱ्यांनी महावितरणने ठरवून दिलेले वीजबिल वेळेत भरल्याने, लिंबाळा येथील महावितरणच्या कार्यालयातून शेतकऱ्यांना काही दिवसातच नवीन विद्युत राेहित्र देण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. हिंगाेली येथून ट्रॅक्टरने सवड येथे विद्युत राेहित्र दाखल हाेताच गावातून बँडताशांच्या गजरात शेतशिवारातील डीपीपर्यंत हे राेहित्र नेण्यात आले. यावेळी रघुनाथ थोरात, गोविंद जावळे, सुग्राव पडोळे, मुंजाजी पडोळे, बापूराव जोजार, हनुमान पडोळे, सुभाष थोरात, श्रीराम रत्नपारखी, सुधाकर रत्नपारखी, मालजी थोरात, नामदेव पडोळे उपस्थित हाेते. राेहित्र बसविल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा रब्बी पिकांना पाणी देण्यास सुरूवात केली आहे.