लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : शहरातील बाजारपेठेत फक्त एकच स्वच्छतागृह आहे. यावर सर्व शहराचा भार आहे. फायबरची स्वच्छतागृहे गायब झाली. तर या एकमेव स्वच्छतागृहाची साफसफाईच नसल्याने अख्खी बाजारपेठ दुर्गंधीमुळे हैराण आहे.वसमत शहराचा विस्तार जसाजसा वाढत आहे, तसतसा असुविधांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. वसमत शहराची लोकसंख्या ६५ हजारांवर आहे. मात्र सार्वजनिक स्वच्छतागृहच नाहीत. शहरात झेंडा चौकाशेजारील गल्लीत एकमेव स्वच्छतागृह आहे. बाजारपेठ व बाहेरगावाहून आलेल्यांना तेथेच जावे लागते. ६५ हजार नागरिकांसाठी एकमेव स्वच्छतागृह असणारे वसमत महाराष्टÑातील एकमेव शहर असावे. मात्र या प्रकाराची वसमत नगरपालिका तमा बाळगत नाही. कधी काळी बाजारपेठेत विविध भागात असलेली पक्की स्वच्छतागृहे गायब झाली. पक्के बांधकाम पाडून जागा वापरात घेतल्या. मात्र त्या जागी पर्यायी व्यवस्था करण्याचे सौजन्य पाळल्या गेले नाही. आता कित्येक वर्षांपासून गैरसोयीचा सामना नागरिक करत आहेत. पाच - सात वर्षांपूर्वी नगरपालिकेने वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून फायबरची स्वच्छतागृहे खरेदी केली होती. आज ती फायबरची स्वच्छतागृहे शोधूनही सापडत नाहीत. गुत्तेदाराचे बिल अदा करण्यापुरती दाखवण्यासाठी आणून परत गुत्तेदाराने ती परत नेली की काय? अशी शंकाही उपस्थित होत असते. नगरपालिकेच्या बेलगाम कारभाराला आवर घालणारी यंत्रणाच नसल्याचे फायबर स्वच्छतागृहांची चोरीची चर्चा होत आहे. झेंडा चौकातेल्या स्वच्छतागृहाचाच वापरात होत आहे. आता जागा वाढविण्याच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागणीकडे पालिका लक्ष देते की कसे? हे पाहणे मात्र रंजक ठरणार आहे.
वसमतला फायबर स्वच्छतागृहे गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 00:04 IST
शहरातील बाजारपेठेत फक्त एकच स्वच्छतागृह आहे. यावर सर्व शहराचा भार आहे. फायबरची स्वच्छतागृहे गायब झाली. तर या एकमेव स्वच्छतागृहाची साफसफाईच नसल्याने अख्खी बाजारपेठ दुर्गंधीमुळे हैराण आहे.
वसमतला फायबर स्वच्छतागृहे गायब
ठळक मुद्देदुर्गंधीत वाढ : एकाच स्वच्छतागृहावर भार