हिंगोलीत बचत गट सदस्याचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:30 IST2017-12-29T23:29:54+5:302017-12-29T23:30:04+5:30
सेनगाव तालुक्यातील जयपूर येथील बचत गटातील सहाय्यक महिलेने गटातील इतर महिलांना विश्वासात न घेता, समाजकल्याण विभागाकडून ट्रॅक्टर उचलून शासनाकडून दिली जाणारी अनुदानाची रक्कम हडप केली. याच्या सखोल चौकशीसाठी मागील चार दिवसांपासून जिल्हा कचेरीसमोर उपोषण सुरू आहे.

हिंगोलीत बचत गट सदस्याचे उपोषण
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील जयपूर येथील बचत गटातील सहाय्यक महिलेने गटातील इतर महिलांना विश्वासात न घेता, समाजकल्याण विभागाकडून ट्रॅक्टर उचलून शासनाकडून दिली जाणारी अनुदानाची रक्कम हडप केली. याच्या सखोल चौकशीसाठी मागील चार दिवसांपासून जिल्हा कचेरीसमोर उपोषण सुरू आहे.
समाजकल्याण विभागातील काही अधिकाºयांना हाताशी धरून हा प्रकार केल्याचा आरोप गटातील महिलांकडून केला जात आहे. महिलांचे कागदपत्र जोडून व अधिकाºयांशी संगनमत करून या सहाय्यक महिलेने अनेकांची फसवणूक केल्याचे निवेदनात म्हटले आहे. सेनगाव तहसील, पं.स. व जिल्हाधिकारी कार्यालयात वेळोवेळी चौकशीचा अर्ज दिला. परंतु अद्याप त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे २६ डिसेंबरपासून हिंगोली येथे जिल्हा कचेरीसमोर उपोषण सुरू आहे. समाजकल्याण विभागातील अधिकाºयांनी उपोषणस्थळी भेट दिली असली तरी, अद्याप मात्र या विषयावर तोडगा निघाला नाही. तर उपोषणार्थी महिलेची प्रकृती खालावल्याने महिलेस जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी हलविले होते. निवेदनावर कान्होपात्रा साळवे, लक्ष्मीबाई मकासरे, पुष्पा खिल्लारे, सिंधू कळंबे आदींच्या स्वाक्षºया आहेत.