शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आठ महिन्यांची 'चंद्रा' निघाली प्रयागराजला; विविध धार्मिक कार्यक्रमात नेहमी असतो सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 19:25 IST

चंद्राला नेण्यासाठी वाहतूक परवाना देखील काढण्यात आला आहे.

इस्माईल जहागिरदार 

वसमत (जि. हिंगोली): प्रयागराज येथे महाकुंभ मेळावा सुरू असून अनेक भाविक तेथे जात आहेत. हे पाहून 'चंद्राला' सोबत घेऊन जाण्याचा निर्णय तिच्या मालकाने घेतला आणि चंद्राही जाण्यासाठी तयार झाली. शनिवारी महाकुंभ मेळ्यासाठी शहरातील अनेक भाविक रवाना झाले असून त्यात म्यानेवार कुटुंबातील सदस्य असलेली चंद्राचा (कालवड) समावेश आहे. चंद्राचा नेहमीच धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग असतो. म्हणून म्यानेवार  कुटुंबाने तिला सोबत नेण्याचा निर्णय घेतला.

वसमत नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सीताराम म्यानेवार यांनी गत आठ महिन्यांपूर्वी चंद्राला  (कालवड) गोशाळेतून घरी आणले.तिच्या आईचे निधन झाले होते तेंव्हा ती पंधरा दिवसांची होती. मान्येवार यांनी चंद्राची देखभाल करण्याची जबाबदारी घेतली. त्यामुळे गोशाळेतून कालवड त्यांना देण्यात आली. चंद्रा आजमितीस आठ महिन्याची झाली आहे. म्यानेवार कुटुंब धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमात जाताच चंद्रा पण त्यांच्या सोबत जाते व कार्यक्रमात सहभाग घेत असते. १५ फेब्रुवारी रोजी माजी उपनगराध्यक्ष म्यानेवार यांच्या सोबत 'चंद्रा',  गोविंद भुसे,गजानन बेंडे,राजू मोरेवार, संतोष बोड्डेवार,दशरथ मजनवार सुभाष फेदराम हे महाकुंभ मेळ्यासाठी रवाना झाले आहेत.

पशुसंवर्धन विभागाने दिली परवानगी...

चंद्राची (कालवड)  महाकुंभला घेऊन जाण्यापूर्वी पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय सावंत यांनी वैद्यकीय तपासणी केली आहे. तसेच चंद्राला नेण्यासाठी वाहतूक परवाना देखील काढण्यात आला आहे.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाPrayagrajप्रयागराजHingoliहिंगोली