कुटुंबियाचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:26 IST2018-02-11T00:26:19+5:302018-02-11T00:26:27+5:30
मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या फरार आरोपींना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी गाडीबोरी येथील मस्के कुटुंबिय पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर १० फेबु्रवारीपासून उपोषणास बसले आहे.

कुटुंबियाचे उपोषण
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या फरार आरोपींना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी गाडीबोरी येथील मस्के कुटुंबिय पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर १० फेबु्रवारीपासून उपोषणास बसले आहे. गाडीबोरी येथील प्रल्हाद शेषराव मस्के यांची मुलगी प्रियंका हिने सासरच्या जाचास कंटाळून विषारी द्रव पिऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सासरच्यांविरूद्ध कुरूंदा ठाण्यात गुन्हाही दाखल आहे. मात्र यातील फरार तीन आरोपींचा शोध पोलीस अधिकाºयांकडून घेतला जात नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी लक्ष देऊन आरोपींच्या अटकेची मागणी मस्के यांनी केली.