पेट्रोल पंपाची डीलरशिप देतो म्हणून एकास १५ लाखांना फसवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 06:32 PM2021-04-09T18:32:57+5:302021-04-09T18:33:26+5:30

मुंबई (वरळी) येथील नऊजणांनी इंडिझेल माय इको एनर्जी प्रा.लि. या नावाने कंपनीची नोंदणी करून कंपनीच्या बायोडिझेलच्या विक्रीसाठी पेट्रोल पंपची डीलरशिप द्यायची असल्याची बनावट जाहिरात तयार केली.

fake promise of dealership of petrol pump, one of them cheated Rs 15 lakh | पेट्रोल पंपाची डीलरशिप देतो म्हणून एकास १५ लाखांना फसवले

पेट्रोल पंपाची डीलरशिप देतो म्हणून एकास १५ लाखांना फसवले

Next

कुरुंदा (जि. हिंगोली) : पेट्रोल पंपाची डीलरशिप देतो म्हणून एकास १५ लाखांना गंडविल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून कुरुंदा पोलीस ठाण्यात मुंबई (वरळी) येथील नऊजणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

मुंबई (वरळी) येथील नऊजणांनी इंडिझेल माय इको एनर्जी प्रा.लि. या नावाने कंपनीची नोंदणी करून कंपनीच्या बायोडिझेलच्या विक्रीसाठी पेट्रोल पंपची डीलरशिप द्यायची असल्याची बनावट जाहिरात तयार केली. यावेळी वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील मुंजाजीराव इंगोले यांना डीलरशिप देतो म्हणून त्यांच्याकडून १६ ऑक्टोबर २०१७ ते ७ मार्च २०१८ च्या दरम्यान अनामत रक्कम म्हणून पंधरा लाख रुपये उकळले. मात्र, काही दिवसांनंतर या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे मुंजाजीराव इंगोले यांच्या लक्षात आले.

या प्रकरणी त्यांनी वसमत न्यायालयात दाद मागितली असता न्यायालयाच्या आदेशाने कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मुंजाजीराव इंगोले यांच्या तक्रारीवरून संतोष आलुरी, जयंत केसकर, सचिन लबडे, ऋषीकेश कुलकर्णी, सारिका शिंदे, पराग कामत, सतीष भुरले, योगेश भदुका, कुणाल गुप्ता (सर्व रा. वरळी, मुंबई) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास वसमतचे शहर पोलीस निरीक्षक गुरमे, सहायक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार करीत आहेत.

Web Title: fake promise of dealership of petrol pump, one of them cheated Rs 15 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.