शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत 'भारतीय बच्चों की बँक' नोटाद्वारे फसवणूक; दोघे अटकेत, लाखोंच्या बनावट नोटा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 18:44 IST

पोलिसांनी रस्त्यावर ट्रॅक्टर आडवे लावून बनावट नोटा टोळीला पकडलं; साडेचार लाखांच्या बनावट नोटा जप्त

कनेरगाव नाका (जि.हिंगोली) : बनावट नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीचा हिंगोली तालुक्यातील बासंबा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, बुधवारी रात्री सापळा रचून पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या आरोपींकडून पाचशे रुपयांच्या बनावट नोटांचे ९ बंडल (प्रत्येक बंडल १०० नोटांचे) असे साडेचार लाख रुपये तसेच चारचाकी गाडी आणि मोबाईल असा १३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

लखन गोपाल बजाज (रा.घाटपुरी नाका, ता.खामगाव जि.बुलढाणा) आणि विजय प्रकाशसिंग ठाकूर (रा.शेगाव नाका, ता.खामगाव, जि.बुलढाणा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 'भारतीय बच्चों की बँक', असे लिहिलेल्या खोट्या नोटा देऊन फसवणूक करणारी टोळी बासंबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या अधारे २५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९ ते ९:३० वाजण्याच्या सुमारास हिंगोली ते वाशिम रस्त्यावर पोलिसांनी सापळा लावला. यावेळी आरोपींना संशय आल्याने त्याने फिर्यादीस खऱ्या नोटो घेऊन कनेरगाव नाका येथे बोलावले. त्या ठिकाणी पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करुन दोघांना ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींकडून ५०० रुपयांच्या खोट्या नोटांचे ९ बंडल, मोबाईल, चारचाकी गाडी असा १३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी आरोपींविरुद्ध बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या पथकाने केली कारवाईपोलिस अधीक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना, उपविभागीय पोलिस अधिकारी कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली बासंबा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विकास आडे, पोलिस उपिनरीक्षक मदन गव्हाणे, कर्मचारी पोले, भडके, हाके, गुंजकर, कऱ्हाळे, शेख, इंगोले, मस्के, शेख, ठेंगडे, गोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ट्रॅक्टर आडवे लावून केली नाकाबंदीबनावट नोटा देणाऱ्या आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी हिंगोली- वाशिम रस्त्यावर टोलनाका येथे नाकाबंदी केली होती. हे लक्षात येताच आरोपींनी त्यांची गाडी राजगावच्या दिशेने वळविली. त्यानंतर राजगाव ते चिंचपुरी रस्त्यावर ट्रॅक्टर आडवे लावून नाकाबंदी केली. तेथूनही आरोपींनी चिंचपुरी गावात गाडी नेत असताना पोलिसांनी त्यांची गाडी आरोपींच्या गाडीसमोर आडवी लावली. त्यानंतर गाडी सोडून आरोपी पळून जात असताना पाठलाग करुन त्यांना पकडण्यात आले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Fake 'Children's Bank' notes scam busted in Hingoli; two arrested.

Web Summary : Police in Hingoli arrested two from Buldhana for using fake 'Children's Bank' notes. ₹4.5 lakh in counterfeit notes, a car, and phones were seized. The total value of seized items is ₹13.2 lakh.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली