हिंगोलीत बनावट मसाला विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 16:12 IST2018-05-26T16:12:43+5:302018-05-26T16:12:43+5:30

नामांकित मसाला कंपनीच्या नावे बनावट मसाला तयार करून त्याची विक्री करणारी व्यापाऱ्याच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने आज पर्दाफाश केला.

fake masala selling racket Busted in Hingoli | हिंगोलीत बनावट मसाला विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

हिंगोलीत बनावट मसाला विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

हिंगोली : नामांकित मसाला कंपनीच्या नावे बनावट मसाला तयार करून त्याची विक्री करणारी व्यापाऱ्याच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने आज पर्दाफाश केला. याप्रकरणी दोन व्यापाऱ्यांविरुद्ध वसमत शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  शेख रिजवान महोमद गौस पाशा व गोवर्धन लोहाना उर्फ राजू गोळीवाला (रा. नांदेड जुना मोंढा) अशी आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत शहरातील मामाचौकातील एका किराणा दुकानात नामांकित कंपनीच्या नावे बनावट मसाला विक्रीसाठी ठेवण्यात आलेला आहे अशी तक्रार एका मसाला कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक शिवाजी घुले यांनी पोलिसांत दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत किराणा दुकानात छापा टाकला. यावेळी दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आलेला ६ हजार ९०० रुपयाचा मसाला जप्त केला.  

या प्रकरणी पोलिसांनी शेख रिजवान या व्यापाऱ्यास अटक केली असून गोवर्धन लोहाना (राजू गोळीवाला) हा फरार आहे. पुढील तपास उपनिरीक्षक एस. के. केंद्रे करत आहेत.   

Web Title: fake masala selling racket Busted in Hingoli