शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कळमनुरीत बनावट विदेशी मद्याचा कारखाना उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 19:23 IST

कारवाईत मोठ्याप्रमाणात बनावट विदेशी मद्य जप्त करण्यात आले

हिंगोली : गोवा राज्यातून चोरट्या मार्गाने आणलेल्या विदेशी मद्याद्वारे बनावट मद्य तयार करून विक्री करणारा कारखाना पिंपळदरी शिवारात उघडकीस आला. कळमनुरी पोलिसांनी केलेल्या या कारवाईत मोठ्याप्रमाणात बनावट विदेशी मद्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी ३ आरोपींविरूद्ध कळमनुरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपळदरी शिवारात शेख बुऱ्हाण शेख कासीम यांच्या शेतातील घरात गोवा राज्यातून आणलेल्या विदेशी दारुच्या बाटल्या आढळून आल्या. आरोपी या द्वारे बनावट विदेशी मद्य तयार कार्यन विक्री करत. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच त्यांनी बुधवारी (दि. २५) शिवारात धाड टाकली. यावेळी शेख बुऱ्हाण तेथे आढळून आला. अधिक चौकशीत हा कारखाना विवेक उर्फ सावकार विश्वनाथ पोंपटवार ( रा. आ.बाळापूर) व गजानन दादाराव रिठ्ठे ( रा. पिंपळदरी ) हे चालवत असल्याची माहिती मिळाली. यावरून वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक  योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोनि जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि शिवसांब घेवारे, पोउपनि किशोर पोटे, संभाजी लेकुळे, आशिष उंबरकर, राजूसिंग ठाकुर आदींनी केली.

टॅग्स :HingoliहिंगोलीraidधाडPoliceपोलिस