अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांना तत्काळ वाटप करावे : पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:26 IST2021-02-08T04:26:23+5:302021-02-08T04:26:23+5:30
शेतकरी सदैव सुलतानी आणि अस्मानी संकटांनी भरडून निघतो. यंदाच्या खरीप हंगामातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नव्हती. ऐन सणासुदीच्या ...

अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांना तत्काळ वाटप करावे : पाटील
शेतकरी सदैव सुलतानी आणि अस्मानी संकटांनी भरडून निघतो. यंदाच्या खरीप हंगामातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नव्हती. ऐन सणासुदीच्या दिवसात हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता. हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. सुरुवातीला अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास विलंब लावून शासनाने शेतकऱ्यांची थट्टा केली असून, आता पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निधी प्राप्त होऊनसुद्धा बँक आणि महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे शासनाने जाहीर केलेल्या मदतीचे अनुदान अनेक गावांना वितरित न झाल्याच्या तक्रारी शेतकरी बांधवांनी केल्या. यावर तातडीने कारवाई करत खा. हेमंत पाटील यांनी हिंगोली जिल्हाधिकारी आणि जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांना तत्काळ अनुदान वाटप करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील सर्वच बँकांच्या शाखेत दिवाळीच्या काळात अनुदान जमा झाले असून, अद्याप अनुदान न वाटप केल्यामुळे बँकांची उदासीनता दिसून येत आहे.